
खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी 10 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची लयलूट करीत दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्रासाठी दहावे सुवर्णपदक पुण्याच्या ईश्वर टाक याने भालाफेक प्रकारात पटकावले.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये संपलेल्या अॅथलेटिक्सच्या मैदानात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या यशाचा झेंडा फडकविला.