esakal | Euro 2020 1st Semi Final Match prediction इटलीचे पारडे जड!
sakal

बोलून बातमी शोधा

Italy vs Spain

Euro 2020 1st Semi Final Match prediction इटलीचे पारडे जड!

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

युरो कप स्पर्धा अंतिम ठप्यात पोहचली आहे. उपात्यं फेरीच्या सामन्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. आजपासून उपात्यंफेरीच्या लढतींना प्रारंभ होत आहे. पहिल्या सामन्यात गेली दोन वर्ष अपराजित असणाऱ्या इटलीच्या संघाचा अश्वमेध स्पेन रोखणार का? याचीच फुटबॉल जगताला उत्सुकता आहे. भक्कम बचाव हेच सर्वोत्तम आक्रमण या सुत्राने खेळणाऱ्या इटलीचे पारडे स्पेनविरुध्द जड ठरण्याची शक्यता आहे. (Euro 2020 1st Semi Final Match prediction Roberto Mancini Italy vs Spain)

फिफा मानांकानात अव्वल असणारा बेल्जियम, तुर्की, तुल्यबळ स्वित्झर्लंड, झुंझार ऑष्ट्रिया यांना पराभूत करून माजी विजेत्या इटलीने उपात्यंफरीत दिमाखात प्रवेश मिळविला. बचावाच्या अभेद्य भिंत कायम ठेवत कौशल्यपुर्ण 11 गोल करीत आक्रमणात ''हम भी कुछ कम नहीं" हे सिध्द केले आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत पात्रता न मिळाल्याची खंत कायम ठेवत प्रशिक्षक राँबर्टे मान्चिनी आणि खेळाडूंनी तब्बल विक्रमी 32 अपराजित सामन्यांची मालिका गुंफली आहे. इटलीचा स्टायकर लोरँझो इनसिने, क्रिओ इमोबाईल यांनी संघाला उपयुक्त गोल नोंदवत चौफेर खेळ केला आहे. बचावफळीत सेंटर डिफेंडर लिओनार्डो, जाँर्जिओ यांनी गोलजाळी अभेद्य ठेवत प्रतिस्पर्ध्यांना लगाम घातला आहे. महत्वाचे म्हणजे प्रशिक्षक मान्चिनी यांनी संघातील 26 पैकी 25 खेळांडूना आळीपाळीने संधी दिल्याने सर्वचजण सर्वोत्तम कामगिरीसाठी ताजेतवाने आणि आसुसलेले आहेत.

हेही वाचा: Wimbledon : जोकोविचनं साजरं केलं क्वार्टर फायनलचं अर्धशतक!

तुलनेत तीन वेळचा माजी विजेता असणाऱ्या स्पेनची वाटचाल अडखळत आहे. क्रोएशिया आणि स्वित्झलँड विरुध्द तर टायब्रेकरमध्ये नशिबाने साथ दिल्यानेच चेंडूवर हुकूमत राखणाऱ्या स्पेनचे आव्हान टिकले. स्पर्धेपुर्वीच स्पेनच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण प्रशिक्षक लुईस एनरिक्यू आणि खेळाडूंनी संधी मिळताच हमला करत उपात्यं फेरी गाठून टिकाकारांची तोंड बंद केले आहे. स्पेनचा मुख्य बचावपटू एमेरिक लँपोर्टेने आणि आघाडीपटू अँल्वारो मोराटा यांच्यावर संघाची भिस्त आहे. दोन्ही संघातील लढतीत दोघांनी प्रत्येकी अकरा विजय नोंदविले आहेत. स्पेन आक्रमणात प्रभावी असला तरी इटलीचा भक्कम बचाव निर्णायक ठरेल.

loading image