esakal | Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

Kasper Schmeichel

Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)

sakal_logo
By
सुशांत जाधव

Euro 2020 England vs Denmark : लंडनमधील वेम्बलेच्या मैदानात इंग्लंडने एक्स्ट्रा टाईममध्ये डेन्मार्कला पराभूत करत 55 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर युरोची फायनल गाठली. या सामन्यात पहिला गोल डेन्मार्कनेच केला. एवढेच नाही तर इंग्लंडला जो बरोबरीचा गोल मिळाला तोही डेन्मारकचा स्वंय गोल होता. एक्स्ट्रा टाईममध्ये स्टर्लिंग कोसळला आणि रेफ्रींनी इंग्लंडला पेनल्टी दिली. हॅरी केनने या संधीच सोनं करत संघासाठी विजय गोल डागला.

रेफ्रींनी दिलेल्या पेन्ल्टीच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. डेन्मार्कच्या कोणत्याही गड्याने स्टर्लिंगला चॅलेंज दिले नव्हते, असे दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. याशिवाय आणखी एक नवा वाद समोर आलाय.

ज्यावेळी डॅनिश गोलकिपर कॅस्पर शमायकल (Kasper Schmeichel) इंग्लिश कर्णधार हॅरी केन (Harry Kane) ची पेनल्टी रोखण्याची तयारी करत होता त्यावेळी स्टेडियमवर असलेल्या इंग्लिश फॅन्सकडून त्याच्या डोळ्यावर लेझर किरणे मारल्याचे काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेमीफायनलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे वादाला तोंड फुटले आहे.

loading image