esakal | EURO: फ्रान्स-जर्मनीसह पोर्तुगालच्या आशा कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Portugal vs France

EURO: फ्रान्स-जर्मनीसह पोर्तुगालच्या आशा कायम

sakal_logo
By
सुशांत जाधव

EURO 2020 Portugal vs France : युरो कप स्पर्धेतील डेथ ग्रुप F मधील वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स आणि युरोचा गतविजेता पोर्तुगाल यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघामध्ये झालेला रंगतदार सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. पहिल्या हाफमधील 30 व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीवर गोल डागत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 45 व्या मिनिटाला फ्रान्सच्या करिम बेंझेमाने पेनल्टीवरच गोलची परतफेड करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. अवघ्या दोन मिनिटात दुसरा गोल डागून करिम बेंझेमाने फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. (EURO 2020 Portugal vs France 2-2 draw Ronaldo and Benzema twice Goal)

हेही वाचा: WTC : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच!

पोर्तुगालची समीकरणे बिकट दिसत असताना पोर्तुगालला आणखी एक पेनल्टी मिळाली आणि रोनाल्डोने पुन्हा दुसरा गोल डागून पुन्हा सामना 2-2 असा बरोबरीत आणला. युरोच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका सामन्यात तीन पेनल्टी आणि तीन गोल पाहायला मिळाले. दोन तुल्यबल संघातील हा सामना फुटबॉल चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. साखळी सामन्यातील शेवटचा सामना 2-2 ड्रॉ असा सुटला.

या ग्रुपमधील जर्मनी आणि हंगेरी यांच्यातील सामनाही 2-2 असा ड्रा राहिला. त्यामुळे हंगेरीचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. दुसरीकडे फ्रान्सने आपल्या ग्रुपमध्ये अव्वलस्थान कायम राखले असून त्यांच्यापाठोपाठ जर्मनीने दुसऱ्या स्थानावर राहत अखेरच्या 16 मधील आपले स्थान पक्के केले आहे. पोर्तुगालने हा सामना बरोबरीत राखल्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर असून त्यांनीही नॉक आउटमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत.

loading image
go to top