esakal | पोगबानं केली रोनाल्डोची कॉपी; बियर कंपनीचा केला 'कचरा'
sakal

बोलून बातमी शोधा

paul pogba

पोगबानं केली रोनाल्डोची कॉपी; बियर कंपनीचा केला 'कचरा'

sakal_logo
By
सुशांत जाधव

युरो कप स्पर्धेतील मैदानातील अ‍ॅक्शनपूर्वी खेळाडूंची प्रेस कॉन्फरन्समधील रिअ‍ॅक्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldos) आता फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोगबा (Paul Pogba) च्या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेस कॉन्फरन्ससाठी आल्यानंतर पॉल पोगबाने सेम टू सेम रोनाल्डोच्या कृतीची कॉपी केली. पोगबाने टेबलवर ठेवलेली Heineken बियरची बाटली टेबलावरुन बाजूला केल्याचे पाहायला मिळाले. (euro cup 2020 cristiano ronaldos action was repeated now france paul pogba removes heineken beer bottle)

यापूर्वी रोनाल्डोचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात रोनाल्डोने कोका कोलाची बाटली बाजूल सरकवत पाण्याची बाटली दाखवली होती. जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील सामन्यात पोगबा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. ज्यावेळी तो प्रेस कॉन्फरन्ससाठी आला त्यावेळी त्याला टेबलवर बीयरची बाटली दिसली. त्याने ही बाटली बाजूला सरकल्याचे पाहायला मिळाले.कोका कोलाप्रमाणेच Heineken बियरसुद्धा UEFA Euro चा अधिकृत स्पॉन्सर आहे. याप्रकरणावर तुर्तास कंपनीने मौन बाळगले आहे.

हेही वाचा: कोक हटवून रोनाल्डोनं दाखवली पाण्याची बाटली; व्हिडिओ व्हायरल

रोनाल्डोने कोका कोलाची बाटली हटवून पाणी पिण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला होता. त्याच्या या कृतीमुळे कोका कोला कंपनीला 4 अब्ज डॉलरचा फटका बसला होता. त्यानंतर आता फ्रान्सच्या मिडफिल्डरने बीयरच्या बाटलीला केराची टोपली दाखवल्याचा परिणामही असाच काही होणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. या कृत्यामुळे खेळाडूंवर काही कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कृतीनंतर कोका-कोला कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. कोका कोलाची स्टॉक किंमत तब्बल 1.6 टक्क्यांनी घसरल्यामुळे कंपनीला 4 अब्ज डॉलरचा फटका सहन करावा लागला. हीच पुनरावृत्ती आता Heineken बियर कंपनीच्या बाबतीतही घडणार का? प्रेस कॉन्फरन्समधील हे प्रकार टाळण्यासाठी आयोजक काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

loading image