esakal | जाणून घ्या Euro Cup चा इतिहास आणि Prize Money ची कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Euro Cup Trophy

जाणून घ्या Euro Cup चा इतिहास आणि Prize Money ची कहाणी

sakal_logo
By
सुशांत जाधव

कोरोनाच्या संकटातून जग हळूहळू सावरतेय. परदेशात खेळही अनलॉक झालाय. सध्याच्या घडीला एका बाजूला टेनिस जगतात फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. यात आता आणखी एका बहुचर्चित आणि प्रतिष्ठित स्पर्धेचा समावेश होणार आहे. 24 संघ.. महिनाभरात 51 सामन्यांची मेजवाणी आणि मग मिळणार विजेता.

फिफा वर्ल्ड कपनंतर क्रीडा जगतातील सर्वाधिक पंसती मिळणाऱ्या Euro Cup स्पर्धेला 12 जून पासून सुरुवात होतेय. सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेतील प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणून घेऊयात स्पर्धेचा आतापर्यंतचा इतिहास आणि बक्षीसाची मोठी रक्कम याबाबतची माहिती (Euro Cup History And Prize Money Story In Marathi)

स्पर्धेचा इतिहास

युरोपातील देशांसाठी एक विशेष स्पर्धा असावी ही कल्पना फ्रेंच फुटबॉल फेडरेशनचे सेक्रेटरी हेन्री डेलॉने यांनी 1927 मध्ये मांडली. फुटबॉल प्लेअर ते रेफ्री अशीही भूमिका बजावलेल्या डेलॉन त्यांच्या निधनानंतर पाच वर्षाने म्हणजेच 1960 पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. युरोपीयन नेशन कप या नावाने फ्रान्सध्ये पहिली स्पर्धा पार पडली. आजच्या घडीला ही स्पर्धा FIFA World Cup नंतरची लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जात असली तरी या स्पर्धेच्या आयोजनातील सुरुवातीचा काळ कठीण असाच होता.

इंग्लंड, पश्चिम जर्मनी आणि इटली या देशाकडून म्हणावा तसा प्रतिसाद त्यावेळी मिळाला नाही. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी अनेक प्रश्न उभे राहिले. पण अखेरच्या टप्प्यात काही संघ समोर आले आणि स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेवर आंतरारष्ट्रीय राजकारणाची छटाही उमटली. 1960 मध्ये रंगलेल्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत स्पेनने सोविएत संघासोबत खेळण्यास नकार देत स्पर्धतून माघार घेतली होती.

स्पर्धा कधी आणि किती संघाचा समावेश

1960 पासून प्रत्येक चार वर्षानंतर ही स्पर्धा घेण्यात येते. विशेष म्हणजे ज्या स्पेनने पहिल्या वर्षी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच स्पेनमध्ये 1964 ची स्पर्धा रंगली. महत्त्वाचे म्हणजे स्पेन आणि सोविएत यांच्यात फायनल सामना रंगला आणि त्यात स्पेनने बाजी मारली.

1960 ते 1976 - 4 संघ

1980 ते 1992- 8 संघ

1996 ते 2012 - 16 संघ

मागील हंगामापासून म्हणजे 2016 पासून 24 संघ या स्पर्धेत खेळत आहेत.

हेही वाचा: संजय मांजरेकरांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका!

कोणी किती वेळा जिंकली ट्रॉफी

आतापर्यंत रंगलेल्या 15 हंगामात जर्मनीने आपला दबदबा दाखवलाय. हा संघ 6 वेळा फायनलमध्ये पोहचलाय तर 1972, 80, आणि 96 असे तीन वेळा त्यांनी जेतेपद पटकावले आहे.

स्पेनच्या संघानेही चार वेळा फायनल गाठली असून यात त्यांनी (1964, 2008 आणि 2012) तीन वेळा जेतेपद मिळवलंय. सलग दोन हंगाम जिंकणारा स्पेन एकमेव संघ आहे.)

ज्या फ्रान्समधून ही स्पर्धा सुरु झाली त्यांनी तीनवेळा फायनलमध्ये धडक मारताना 1984 आणि 2000 मध्ये चॅम्पियनवाली किक मारलीये.

सोविएत युनियन (1960), इटली (1968), चेक प्रजासत्ताक (1976), पोर्तुगाल (2016), नॅदरलंड (1988), डेन्मार्क (1992), ग्रीस (2004)

हेही वाचा: सेरेनाचा खेळ खल्लास! 21 वर्षांच्या पोरीनं रडवलं!

पहिल्यांदाच सेमीफायनलचा निकाल टॉसवर झाला आणि त्याच वर्षी फायनल दोनवेळा

1968 मध्ये इटली आणि सोविएत यूनियन यांच्यातील सेमीफायनल 0-0 असा बरोबरीत निकाल लागला. पहिल्यांदाच सामन्याचा निकाल टॉस उडवून घेण्यात आला यात इटलीने फायनल गाठली. यानंतर कधीच फुटबॉलचा निकाल टॉसवर झालेला नाही. 1968 चा फायनला सामनाही दोनवेळा झाला. इटली आणि युगोस्लाविया यांच्यात अतिरिक्त वेळेत गेलेला सामना 1-1 से बराबरीत सुटला. दोन दिवसानंतर झालेल्या सामन्यात इटलीने 2-0 अशी बाजी मारली.

फुटबॉल वर्ल्ड कपनंतर सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा

फुटबॉल वर्ल्डकपनंतर सर्वाधिक पाहिली जाणाऱी स्पर्धा म्हणून युरो कप स्पर्धा ओळखली जाते. 2012 मध्ये इटली आणि फ्रान्स यांच्यात झालेला सामना जगभरातील जवळपास 30 कोटी लोकांनी पाहिला होता. मागील हंगामात म्हणजे 2016 मध्ये फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात फायनल रंगली होती. पोर्तुगाल चॅम्पियन ठरलेली ही मॅच जगभरात जवळपास 28 कोटी लोकांनी पाहिली होती. गत हंगामातील रिव्यन्यू हा 16 हजार 280 कोटी इतका प्रचंड होता. कोरोनामुळे यंदाच्या हंगामातील उत्पनावर निश्चितच परिणाम दिसेल.

प्राईज मनी

UAFAच्या माहितीनुसार 1960 मध्ये पहिल्यांदा फायनल जिंकणाऱ्या सोवियत यूनियनच्या 17 खेळाडूंना प्रत्येकी 200-200 डॉलर म्हणजे संघाला 3400 डॉलरचे बक्षीस देण्यात आले होते. ही रक्कम जवळपास 2.5 लाखाच्या घरात होती. यावेळी बक्षीचा आकडा हा 1300 पटीने वाढला असून ही रक्कम 3300 कोटींच्या घरात आहे. विजेत्या संघाला जवळपास 88 कोटी बक्षीस मिळणार आहे,