महाराष्ट्र केसरी 2020 : जाणून घ्या अंतिम फेरीतील मल्लांची वैशिष्ट्ये

संदीप खांडेकर
Tuesday, 7 January 2020

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

पुणे  : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरचा हप्ते,‌तर  लातूरच्या शैलेश शेळकेचा बॅक थ्रो डव भारी पडणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोघेही वस्ताद काका पवार यांच्या तालमीत मल्ल असून, दोघांत महाराष्ट्र केसरीचा दावेदार कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

हर्षवर्धन व शैलेश यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. प्रतिस्पर्धी तगड्या मल्लांचे आव्हान यशस्वीपणे पेलत त्यांनी प्रेक्षकांचे अंदाज फोल ‌ठरवले. दोघेही काकांच्या तालमीत असल्याने त्यांना एकमेकांचे डाव माहीत आहेत. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार याची प्रेक्षकांत उत्सुकता आहे.

हर्षवर्धन
- गेले सहा महिने गदेसाठी कसून सराव
- हाप्ते डावावर हुकूमत
- 2009 पासून पवार यांच्या तालमीत
- गदा पटकावण्याचा आत्मविश्वास

शैलेश
- दररोज सहा तास जबरदस्त मेहनत
- बॅंक थ्रो ‌डावावर हुकूमत
- २०१५ पासून काकांच्या तालमीत सराव
- जिंकण्यासाठीच‌ मैदानात उतरणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facts of Shailesh Shelke and Harshvardhan Sadgir finalist of Maharashtra Kesari 2020