अलविदा शेन वॉर्न! फ्रेंड्स अँण्ड फॅमिलीनं दिला अखेरचा निरोप

Shane Warne’s family and friends say goodbye at private funeral
Shane Warne’s family and friends say goodbye at private funeral

क्रिकेट जगतात आपल्या फिरकीची जादू दाखवून देणाऱ्या शेन वॉर्नला (Shane Warn) मेलबर्न येथील St Kilda Football Club च्या मैदानातून रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. 4 मार्च 2022 रोजी थायलंडमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नचे ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले होते. वॉर्नची तीन मुले ब्रुक 24, जॅक्सन 22 आणि 20 वर्षीय समर यांच्यासह वॉर्नचे आई वडील अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मार्क टेलर, एलन बॉर्डर, इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन याच्यासह 80 लोक शेन वॉर्नला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. (Shane Warne’s family and friends say goodbye at private funeral)

दिग्गज फिरकीपटूच्या निधनानंतर त्याचा मृत्यू नैसर्गिक झालाय की संशयास्पद यासंदर्भात चर्चा रंगली होती. याप्रकरणात थायलंड पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपासही केल्याचे पाहायला मिळाले. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात खासगी जेटने वॉर्नचे पार्थिव थायलंडहून मेलबर्नला आणले होते. मेलबर्न ग्राउंडवर 30 मार्च रोजी राजकीय सम्मानासह त्याला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी सामान्य नागरिकांनाही प्रवेश दिला जाणार आहे.

Shane Warne’s family and friends say goodbye at private funeral
शेन वॉर्न हा काही सर्वोत्तम फिरकीपटू नव्हता : सुनिल गावसकर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी 700 चा पल्ला गाठणाऱ्या शेन वॉर्नच्या नावे 708 विकेट्स आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नच्या नावे 1000 हून अधिक विकेट्स जमा आहेत. ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ चा पराक्रमही अजूनही वॉर्नच्या नावेच आहे. मॅचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने 1993 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या अशेस मालिकेत माइक गॅटिंग यांना त्याने अविस्मरणीयरित्या चेंडू वळवल्याचे पाहायला मिळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com