esakal | T20 World Cup: 'त्या' फलंदाजाला वगळल्याने माजी क्रिकेटपटू नाराज
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India-T20

T20 World Cup: 'त्या' फलंदाजाला वगळल्याने माजी क्रिकेटपटू नाराज

sakal_logo
By
विराज भागवत

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची नुकतीच झाली घोषणा

T20 World Cup 2021: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा अपेक्षेपेक्षा आधीच आटपला. भारतीय संघाने दमदार खेळ करत २-१ ने मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर कोरोनामुळे शेवटचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू IPLसाठी युएईत दाखल झाले. आता युएईमध्ये आधी IPL 2021 नंतर टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. त्यात एका फलंदाजाला स्थान न मिळाल्याने भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी जोरदार टीका केली.

हेही वाचा: T20 World Cup: "रोहित, विराट, धोनी अन् शास्त्री गुरूजी..."

"BCCI निवड समितीने जो संघ निवडला आहे. तो खूपच चांगला आणि संतुलित आहे असं मला प्रथमदर्शनी वाटलं. कारण संघात सूर्यकुमारला स्थान देण्यात आलंय. राहुल चहर एक चांगला फिरकीपटू आहे. जसप्रीत बुमराहसारखा वेगवान मारा करणारा गोलंदाज आहे. रविंद्र जाडेजा, रोहित शर्मा सारेच आहेत. त्यामुळे हा संघ संतुलित असल्याचे दिसते. पण यात शिखर धवनला घेतलं नसल्याने मी नाराज आहे", असे फारूख इंजिनियर म्हणाले.

Shikhar Dhawan

Shikhar Dhawan

हेही वाचा: T20 World Cup: चहलला का वगळलं? निवड समितीने सांगितलं कारण

"शिखर धवनला संघात स्थान नाही हे पाहून मला धक्काच बसला. गेल्या काही स्पर्धांमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याने अप्रतिम अशी कामगिरी बजावली आहे. पण आपल्या निवड समितीची हीच समस्या आहे की त्यांनी शिखर धवनसारख्या प्रतिभावान फलंदाजाला संघातून वगळलं. निवड समितीच्या या निर्णयाचं मला खूपच वाईट वाटतंय. कारण शिखर धवन हा असा खेळाडू आहे जो आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर कोणत्याही संघात फलंदाज म्हणून निवडला जाऊ शकतो. धवनने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे अशा खेळाडूला संघाबाहेर ठेवलं जायला नको होतं", असे मत त्यांनी नोंदवले.

loading image
go to top