Wimbledon 2019 : कोण जिंकणार... फेडरर की नदाल? 

Federer vs Nadal in Wimbledon
Federer vs Nadal in Wimbledon

लंडन : जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष विश्वकंरडक स्पर्धेवर केंद्रित असताना क्रीडाविश्वास रॅफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातील विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील उपांत्य लढतीचे वेध लागले आहेत. ही दोघातील विम्बल्डन स्पर्धेतील चौथी लढत आहे; पण आपल्यात अमेरिकन स्पर्धेत कधीच लढत झाली नाही, हे त्यांना सलत आहे. 

फेडरर आणि नदाल यांच्यातील एकंदर 40 वी लढत उद्या होईल. फेडररने 2006 आणि 2007 मधील लढत जिंकली होती, तर नदालने 2008 ची पाच सेटची. फ्रेंच टेनिस स्पर्धेत दोघात सहा सामने झाले आहेत; तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेत चार वेळा. मात्र अमेरिकन स्पर्धेत एकदाही नाही. आश्‍चर्य म्हणजे फेडररने पाच वेळा; तर नदालने तीन वेळा अमेरिकन स्पर्धा जिंकली आहे; पण त्यांचा सामना झालेला नाही. दोघांतील लढतीत फेडररचे 24-15 वर्चस्व आहे; तर विम्बल्डनमध्ये 2-1, क्‍ले नसलेल्या कोर्टवर 13-10. 

आमच्यातील अनेक लढती रंगतदार झाल्या आहेत. या स्पर्धेतील सामनेही चुरशीचे झाले आहेत. पण अमेरिकन स्पर्धेत एकही सामना कसा नाही हे पाहून मलाही धक्का बसला, असे नदालने सांगितले. दोनदा ही स्पर्धा जिंकलेला नदाल 2012 ते 2017 दरम्यान चौथी फेरीही पार करू शकला नव्हता, पण गतवर्षी तो सव्वापाच तासांच्या कडव्या लढतीनंतर पराजित झाला होता. फेडररविरुद्ध बिम्बल्डनमध्ये अकरा वर्षांनंतर खेळणार आहे, त्याचे नक्कीच वेध लागले आहेत, असे नदालने सांगितले. 

ग्रास कोर्ट माझे आहे, तर क्‍ले कोर्ट नदालचे आहे. नदालच्या ग्रास कोर्टवरील खेळात खूपच प्रगती झाली आहे. त्याचा खेळही बदलला आहे. त्याची सर्व्हिसही आता प्रभावी झाली आहे. आता तो केवळ क्‍ले कोर्ट स्पेशालिस्ट नाही. 
- रॉजर फेडरर 

माझ्या ग्रास कोर्टवरील खेळात फारसा बदल झालेला नाही. आता वाढत्या वयामुळे हालचाली काहीशा मंदावल्या आहेत; त्यामुळे जास्त भर ताकदवान सर्व्हिसवर आहे. बॅकहॅंड तसेच व्हॉलीही आता चांगली होत आहे. पण खेळात खरंच सुधारणा झाली आहे का, हे सांगणे अवघड आहे. मात्र आम्ही एकमेकांना चांगल्या खेळासाठी प्रेरित करतो, हे मात्र नक्की. 
- रॅफेल नदाल 

फेडररचे विम्बल्डनमध्ये विजयाचे शतक 
- विम्बल्डन स्पर्धेतील विजयाचे शतक पूर्ण 
- 21 वर्षे खेळताना अकरा वेळा अंतिम फेरीत, आठदा विजेतेपद 
- मार्टिना नवरातिलोवा (120, विम्बल्डन) आणि ख्रिस एव्हर्टच्या (101, अमेरिकन ओपन) पंक्तीत 
- एका ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सर्वाधिक विजयाचा यापूर्वीचा विक्रम जिमी कॉनर्सचा (98, अमेरिकन ओपन) 
- स्लॅम स्पर्धेच्या एकेरीत 350 विजय याच स्पर्धेत पूर्ण 
- फ्रेंच स्पर्धेत 400 ग्रॅंड स्लॅम सामने खेळण्याचा पराक्रम 
- फेडरर 45 व्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. यात ख्रिस एव्हर्ट (52) अव्वल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com