

- अनुपमा गोखले
तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दीड गुणासहीत चीनच्या डिंग लिरेन विरुद्ध बरोबरी साधली आहे. भारतीय बुद्धिबळप्रेमींना मुख्य भावलेली गोष्ट म्हणजे तिसऱ्या सामन्यात गुकेशच्या खेळाचा उंचावलेला दर्जा!
पहिल्या सामन्यात गुकेश आपल्या खेळाची लय तर गमावून बसला नाही ना, अशी शंका त्याच्या खंद्या पाठीराख्यांनासुद्धा आली. मॅग्नस कार्लसननेसुद्धा गुकेशच्या पहिल्या सामन्यातील खेळावर टीका केली; परंतु पहिल्यावहिल्या जागतिक पातळीवरच्या लढतीत अनुभवी गुकेशकडून काही चुका झाल्यास त्या क्षम्यच मानल्या पाहिजेत.