Spanish Kiss Controversy: महिला खेळाडूला सर्वांसमोर किस करणे पडले महागात, स्पॅनिश फुटबॉल अध्यक्ष सस्पेंड

Spanish Kiss Controversy
Spanish Kiss Controversy

Spanish Kiss Controversy FA Chief Suspended : स्पेनच्या फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांना आपल्या संघातील महिला फुटबॉलपटूला किस करणे चांगलेच महागात पडले आहे. फिफाने यावर कारवाई केली असून स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष लुइस रुबियलसला फुटबॉल उपक्रमातून निलंबित करण्यात आले आहे. फिफा महिला वर्ल्ड कप दरम्यान त्याने एका महिला फुटबॉलपटूला किस घेतल्याने वाद निर्माण झाला होता.

Spanish Kiss Controversy
IBSA World Games : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकले सुवर्णपदक

स्पॅनिश माध्यमांमध्ये लुइस रुबियलस यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरल्यानंतर फिफाने वादाचा प्राथमिक तपास सुरू केला. 46 वर्षीय लुइस रुबियलस स्टार फुटबॉलपटू जेनी हर्मोसोला सर्वांसमोर किस केले. गेल्या रविवारी सिडनी येथे फिफा महिला वर्ल्ड कप फायनलनंतर सादरीकरण समारंभात ही घटना घडल्याने वाद निर्माण झाला होता.

Spanish Kiss Controversy
Naseem Shah : 'एक दिवस मला हृदयविकाराचा...' आशिया कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूला मृत्यूची भीती! वक्तव्याने उडाली खळबळ

जेनी हर्मोसोचे किस घेतल्याच्या वादानंतर जागतिक फुटबॉलची प्रशासकीय संस्था फिफाने शनिवारी 26 ऑगस्ट रोजी स्पॅनिश अध्यक्षांना तात्पुरते निलंबित केले आहे. रुबियलसने राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर फिफाचा निर्णय एका दिवसानंतर आला आहे.

फिफाने लादलेले हे निलंबन 24 ऑगस्टपासून लागू होईल आणि सुरुवातीच्या 90 दिवसांच्या कालावधीसाठी असेल. रुबियलसविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही सुरू झाली आहे. फिफाने गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला, जेव्हा स्पॅनिश माध्यमांमध्ये रुबियलसच्या राजीनाम्याच्या अफवा येत होत्या.

मीडिया आणि राजकीय आघाडीवर जोरदार टीका झाल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, असे मानले जात होते. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनीही रुबियाल्स यांना पद सोडण्यास सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com