FIFA Women's World Cup : पुरुष-महिला समानतेपासून ‘फिफा’ दूरच - जियानी इन्फांटिनो

महिला वर्ल्डकपमधून विक्रमी उत्पन्न मिळवूनही समान बक्षीस रक्कम नाही
FIFA Women's World Cup
FIFA Women's World Cupsakal

सिडनी : आता केवळ अंतिम सामना शिल्लक असलेल्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांनी यजमानपद भूषवलेल्या महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आणि ५७ कोटी डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असले तरी पुरुष-महिला विजेत्यांना समान बक्षीस रक्कम असणार नाही, असे ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी स्पष्ट केले.

‘फिफा’च्या सध्याच्या रचनेनुसार पुरुषांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील विजेत्याला ४४ कोटी डॉलर देण्यात येतात, तर महिला स्पर्धेतील विजेत्याला केवळ ११ कोटी डॉलर एवढीच रक्कम देण्यात येते. महिलांनाही पुरुषांएवढी समान बक्षीस रक्कम देण्याची मागणी करण्यात येत आहे, पण इन्फांटिनो यांनी हे सध्या तरी शक्य नसल्याचे सांगितले.

महिलांची विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्यासाठी होणारा खर्च त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा जास्त असतो, त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला अनुदान देऊन स्पर्धा खेळवावी लागते. परिणामी समान बक्षीस रक्कम देता येणार नाही, असे इन्फांटिनो यांनी ‘फिफा’च्या महिला फुटबॉल कनव्हेंशनमध्ये सांगितले.

अनुदानाची गरज असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, कारण ही आमची जबाबदारी आहे, पण यावेळच्या स्पर्धेने ५७ कोटी डॉलरची कमाई करून अगोदरचे सर्व विक्रम मोडले आहेत.

समान बक्षीस रकमेच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इन्फांटिनो यांनी चेंडू महिला फुटबॉलकडेच टोलावला. आम्ही योग्य दिशेने पुढे जात असलो तरी आपल्या खेळाची लोकप्रियता वाढवण्याची जबाबदारी महिला खेळाडूंची आहे आणि त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील यंदाच्या या विश्वकरंडक स्पर्धेने घवघवीत यश मिळवले; परंतु ते पुढेही कायम राहायला हवे असे ते म्हणाले.

महिलांना अधिक बक्षीस रक्कम द्या

`फिफा’ स्वतः सध्या तरी पुरुष आणि महिला विश्वकरंडक विजेत्याला समान बक्षीस रक्कम देऊ शकत नसले तरी इन्फांटिनो यांनी आपापल्या देशांत होणाऱ्या महिला फुटबॉल स्पर्धातून खेळाडूंना मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम द्या, असे ब्रॉडकास्टर्स आणि पुरस्कर्ते यांना सुचवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com