नेमारला डेट करणारी मॉडेल कॅरोलिन झाली त्याच्या मित्राच्या बाळाची आई| FIFA World Cup Neymar Karoline Lima | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Neymar Karoline Lima

FIFA World Cup : नेमारला डेट करणारी मॉडेल कॅरोलिन झाली त्याच्या मित्राच्या बाळाची आई

FIFA World Cup 2022 Neymar Karoline Lima : ब्राझीलची स्टार मॉडेल कॅरोलिन लीमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 26 वर्षाची कॅरोलिनचे इन्स्टाग्रामवर 39 लाख फॉलोअर्स आहेत. एकेकाळी ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमारची ती गर्लफ्रेंड होती. दोघेही रिलेशनशिपध्ये होते माक्ष नेमारसोबत तिचे ब्रेकअप झाले. आता ती नेमारबरोबर खेळणाऱ्या एडर मिलिटाओच्या मुलाची आई झाली आहे. कॅरोलिनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली.

ब्राझील आणि रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू एडर मिलिटाओ पासून देखील कॅरोलिन वेगळी झाली आहे. ज्यावेळी कॅरोलिन मिलिटाओपासून वेगळी झाली त्यावेळी तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. ती एका नाईट आऊटदरम्यान वेगवेगळ्या तीन पुरूषांना किस करताना दिसत होती. हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले होते.

कॅरोलिन ही Farofa da Gkay नावाच्या एका कार्यक्रमात देखील दिसली होती. या कार्यक्रमात कॉमेडियन गेसिका कायनेच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन होत होते. या ठिकाणी तीन पुरूषांना कॅरोलिन किस करताना दिसली. नेमारसोबत जरी तिचे ब्रेकअप झाले असले तरी ती दक्षिण कोरियाविरूद्धच्या सामन्यात ब्राझीलला पाठिंबा दर्शवण्यासाठी कतारमध्ये गेली होती. हा सामना ब्राझीलने 4 - 1 असा जिंकला होता.

फिफाच्या रँकिंगमध्ये ब्राजीलचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा क्वार्टर फायनल सामना क्रोएशियासोबत होणार आहे. क्रोएशिया रँकिंगमध्ये 12 व्या स्थानावर आहे. ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमारने या सामन्यापूर्वी 'आम्ही विजेतेपदाचे स्वप्न नक्कीच पाहत आहोत. यासाठी आम्ही एकावेळी एक पाऊल पुढे टाकत आहोत. चार सामने झाले आहेत. अजून तीन सामने बाकी आहेत. आम्ही तयार आहोत. आमचे लक्ष विजेतपद जिंकण्याकडे आहे.'

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’