FIFA WC22: फ्रान्स का अर्जेंटिना; 165 कोटींची ट्रॉफी कोणाच्या खिशात जाणार? : France vs Argentina Final FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fifa World Cup 2022 Winner Prize Money in Indian Rupees

FIFA WC22: फ्रान्स का अर्जेंटिना; 165 कोटींची ट्रॉफी कोणाच्या खिशात जाणार?

FIFA World Cup 2022 Winner Prize Money in Indian Rupees : FIFA विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने सहाव्यांदा फिफा विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मंगळवारी मध्यरात्री खचाखच भरलेल्या लुसेल स्टेडियममध्ये मेस्सीच्या नावाचाच गजर सुरू होता. मेस्सीनेही देशासाठी खेळताना नेहमीप्रमाणे निःस्वार्थ खेळ केला. लिओनेल मेस्सी व लहानपणी त्याला आदर्श माननारा ज्युलियन अल्वारेझ यांनी केलेल्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने क्रोएशियावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि जेतेपदाची लढत निश्चित केली.

हेही वाचा: FIFA WC22: मोरोक्कोचे स्वप्न भंगले! गतविजेत्या फ्रान्सचा धडाका; फायनलमध्ये मेस्सीशी लढत

तर आज उपांत्य फेरीत धडाकेबाज फ्रान्सने मोरोक्कोचा स्वप्नवत प्रवास रोखून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. थिओ हेर्नांडेझ आणि कोलो मुआनीकडे यांनी गोल केले. फ्रान्सने मोरोक्कोला पराभूत करून अंतिम फेरी गाठली, त्याआधी अर्जेंटिनाने क्रोएशियाला हरवून अंतिम फेरी गाठली. विश्वविजेतेपदासाठी आता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी महामुकाबला होणार आहे. तुम्हाला माहीत आहे का फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाला मिळणाऱ्या ट्रॉफीची किंमत 165 कोटी रुपये आहे.

एका अहवालानुसार, यावेळी फिफा विश्वचषकात दिलेली ही सर्वात महागडी ट्रॉफी असणार आहे. त्याची किंमत 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. त्याचे भारतीय चलनात रूपांतर केल्यास त्याची किंमत सुमारे 165 कोटी रुपये आहे.

हेही वाचा: FIFA WC22: मोरोक्कोचे स्वप्न भंगले! गतविजेत्या फ्रान्सचा धडाका; फायनलमध्ये मेस्सीशी लढत

विजेत्याला खरी ट्रॉफी का दिली जात नाही

ट्रॉफीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फिफा विश्वचषक विजेत्या संघालाही खरी ट्रॉफी दिली जात नाही, तर सारखी दिसणारी ट्रॉफी दिली जाते. ज्याला प्रतिकृती ट्रॉफी म्हणतात. यामागे एक किस्सा आहे, प्रत्यक्षात ट्रॉफी दोनदा चोरीला गेली आहे. एकदा ही ट्रॉफी हरवली तेव्हा एका कुत्र्याला ती सापडली. ट्रॉफी एका ठिकाणी कागदात गुंडाळलेली होती. सुरक्षेच्या दृष्टीने रिअल ट्रॉफीच्या जागी प्रतिकृती ट्रॉफी नंतर विजेत्या संघाला दिली जाते. स्पर्धेदरम्यान प्रतिकृती ट्रॉफी देखील ठेवली जाते. ट्रॉफी अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आणली जाते. ही ट्रॉफी स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्यात आली आहे.