FIFA World Cup 2022 messi vs ronaldo See which team group
FIFA World Cup 2022 messi vs ronaldo See which team groupsakal

FIFA World Cup : वेळापत्रक ठरलं! मेस्सी-रोनाल्डो संघ कोणत्या गटात?

FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 संदर्भात आयोजकांनी मोठी घोषणा

FIFA World Cup 2022 : FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 संदर्भात आयोजकांनी मोठी घोषणा करण्यात आले आहे. FIFA विश्वचषक स्पर्धेसाठी गट फायनल झाली आहे. कतार येथे होणाऱ्या या विश्वचषकासाठी चार संघांना 8 गटात ठेवण्यात आले आहे. हा अंतिम ड्रॉ आहे, परंतु अद्याप 3 संघांची घोषणा झालेली नाही.

कतार येथे होणाऱ्या FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 साठी अ गटात यजमान कतार, इक्वेडोर, सेनेगल आणि नेदरलँड्स आहेत, तर ब गटात इंग्लंड, इराण, यूएसए आणि युरो कप प्लेऑफ संघ आहेत. तर, गट क मध्ये अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड यांचा समावेश आहे, तर गट डी मध्ये फ्रान्स, आयसी प्लेऑफ 1, डेन्मार्क आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे.

गट E मध्ये स्पेन, IC प्लेऑफ 2, जर्मनी आणि जपान यांचा समावेश आहे, तर गट F मध्ये बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को आणि क्रोएशिया यांचा समावेश आहे. ग्रुप जी बद्दल बोलायचे झाले तर, ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड आणि कॅमेरून यांना स्थान मिळाले आहे, तर पोर्तुगाल, गाना, उरुग्वे आणि कोरिया रिपब्लिक यांना शेवटच्या ग्रुप एचमध्ये पात्र होण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत कतारमध्ये खेळवली जाईल.

युक्रेनवर हल्ला केल्याप्रकरणी रशियाला स्पर्धेतून बाहेर फेकण्यात आले आहे. युक्रेनला अजूनही पात्रतेची पूर्ण आशा आहे. पात्र होण्यासाठी, युक्रेनला स्कॉटलंडविरुद्ध प्लेऑफची उपांत्य फेरी खेळायची होती. हा सामना जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. या सामन्यातील विजेत्या संघाला विश्वचषक खेळण्यासाठी वेल्स संघाशी मुकाबला करावा लागणार आहे. अशाप्रकारे युक्रेनच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com