fifa world cup 2022 : स्वतःच्या देशाच्या पराभवाचा आनंद साजरा करणे जिवावर

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणचा संघ पराभूत झाला
FIFA World Cup 2022 Iran
FIFA World Cup 2022 Iran esakal

तेहरान : कतारमध्ये होत असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणचा संघ पराभूत झाला आणि त्यांचे आव्हान संपले, परंतु स्वतःच्या संघाच्या पराभवाचा आनंद साजरा करण्याचे कृत्य इराणच्या एका नागरिकाच्या मुळावर आले. सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून त्याला ठार मारले. या नागरिकाचे हे कृत्य देशविरोधी आहे,

असे समजून सुरक्षा रक्षकांनी त्याला गोळ्या मारल्या. मेहरान समक असे या व्यक्तीचे नाव असून तो २७ वर्षांचा होता. इराण संघाचा पराभव होताच त्याने आपल्या गाडीचा हॉर्न आनंदाने जोरजोराने वाजवण्यास सुरुवात केली. इराणचा अमेरिकेविरुद्ध पराभव झाला. या लढतीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com