fifa world cup 2022 : सौदीकडून अर्जेंटिनावरचा विजय सुट्टी देऊन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup Squad Argentina announce

fifa world cup 2022 : सौदीकडून अर्जेंटिनावरचा विजय सुट्टी देऊन साजरा

रियाध : कतारमध्ये होत असलेल्या २२ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल काल (ता. २२) लागला. बलाढ्य संघ आणि संभाव्य विजेत्या असणाऱ्या अर्जेंटिनाचा तुलनेने कमकुवत असणाऱ्या सौदी अरेबियाने २-१ असा पराभव केला आणि स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश होऊन सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी आज (ता. २३) बुधवारी देशातील सर्वच सरकारी, खाजगी कर्मचाऱ्यांना आणि देशातील विविध शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुटी जाहीर केली होती.

गेल्या सलग ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अर्जेंटिनाचा संघ अपराजित राहिला होता. मात्र काल झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबिया संघाने त्यांचा पराभव केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. सुरुवातीला अशक्यप्राय वाटणारा विजय साकारल्याने सौदीच्या राजघराण्याने खुश होऊन बुधवारी देशाला एक दिवसाची सुटी दिली होती आणि आपल्या संघाचा विजय साजरा केला.