FIFA WC22 : कतारमध्ये उडाली खळबळ! 48 तासांत आणखी एका पत्रकाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Second Journalist dies

FIFA WC22 : कतारमध्ये उडाली खळबळ! 48 तासांत आणखी एका पत्रकाराचा मृत्यू

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2022 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कतारमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला. ग्रँट वहल असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याचा मृत्यू फक्त 48 तास उलटून गेले आणि पुन्हा एकदा कतारमध्ये खळबळ उडाली आहे. खरं तर, गल्फ टाइम्सने रविवारी बातमी दिली की खालिद अल-मिसलाम कतार फोटो पत्रकाराचा अचानक मृत्यू झाला. या स्पर्धेत पत्रकाराचा मृत्यू होण्याची ही दुसरी वेळ आहे.

हेही वाचा: Cristiano Ronaldo : ''रोनाल्डोला न खेळवण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप नाही''

कतरी आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार, 'कतार 2022 फिफा विश्वचषक कव्हर करत असताना अल-मिसलाम यांचा अचानक मृत्यू झाला. अल-मिसलामच्या मृत्यूच्या आजूबाजूची परिस्थिती अस्पष्ट आहे. तो कतारी न्यूज चॅनल अल कास टीव्हीसाठी काम करत होता. कतारमधील विश्वचषक स्पर्धेत अमेरिकन पत्रकार ग्रँट वहल यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत ही बातमी समोर आली आहे. प्रतिष्ठित लुसेल स्टेडियमवर उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत अल-मिसलाम अचानक कोसळला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Ind vs Ban Test: BCCI ऋषभ पंतचे पंख छाटतय; ODI झालं आता कसोटीतही टांगती तलवार?

याआधी कतारमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला होता. ग्रँट हा तोच पत्रकार आहे ज्याने काही दिवसांपूर्वी वृत्त दिले होते की समलिंगी समुदायाचे समर्थन करणारा शर्ट परिधान केल्याबद्दल त्याला कतारमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे अनेक अर्थ काढले जात आहेत.