FIFA World Cup : ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड यांचं आमच्यासमोर आव्हान; मेस्सीने व्यक्त केली भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

FIFA World Cup : ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड यांचं आमच्यासमोर आव्हान; मेस्सीने व्यक्त केली भीती

FIFA World Cup 2022 : विश्वकरंडक जिंकण्याच्या आपल्या मार्गात ब्राझील, फ्रान्स आणि इंग्लंडचे अडथळे येऊ शकतात, अशी भीती अर्जेंटिनाचा सुपरस्टार मेस्सीने व्यक्त केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेसाठी मेस्सी त्याच्या संघासह कतारमध्ये दाखल झाला असून सरावही सुरू केला आहे. ३५ वर्षीय मेस्सीची ही अखेरची विश्वकरंडक स्पर्धा असेल. दिएगो मॅरेडोनानंतर अर्जेंटिनाला पुन्हा विश्वविजेते होण्यासाठी मेस्सीवर सर्वांत मोठी मदार आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

विश्वकरंडक स्पर्धेत जेव्हा जेव्हा आपण संभाव्य विजेत्या संघांबाबत बोलतो, तेव्हा तीच नावे समोर येतात. अर्थात ब्राझील, फ्रान्स आणि इंग्लंड हे प्रबळ दावेदार असतील, पण विश्वकरंडक स्पर्धेत काहीही घडू शकते असा इतिहासही आहे, असे मेस्सी म्हणतो. मेस्सीने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाला २०१४ च्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठून दिली होती, परंतु जादा डावात जर्मनीकडून अर्जेंटिनचा पराभव झाला होता. कोपा अमेरिका स्पर्धेत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने यंदा सलग ३५ सामन्यांत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे.

हेही वाचा: Irfan Pathan :''भारतीय संघाची मानसिता बदलण्याची गरज, कर्णधार नाही!''

आम्ही एकेका सामन्याचा विचार करणार आहोत. त्यामुळे पहिले लक्ष सलामीचा सामना जिंकण्यावर असणार आहे. जेवढे अधिक मैदानावर खेळू, जेवढा अधिक वेळ देऊ तेवढे आम्ही एकमेकांना समजून घेऊ, असेही अर्जेंटिना संघाबाबत मेस्सी म्हणाला.