Virat Kohli: कोहलीच्या पबवर बेंगळुरू पोलिसांची कारवाई; एफआयआर केलं दाखल, काय आहे प्रकरण?

FIR Against Manager of Virat Kohli's One8 Commune In Bengaluru: बेंगळुरूमधील एमजी रोडवर वन8 कम्युन पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
FIR Against Manager of Virat Kohlis One8 Commune In Bengaluru
FIR Against Manager of Virat Kohlis One8 Commune In BengaluruEsakal

बेंगळुरूमधील एमजी रोडवर वन8 कम्युन पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.कर्नाटकच्या बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मालकीचे एक पबही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील एमजी रोडवर एक 8 कम्युन पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, वन 8 पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दिलेली वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरू असल्याचा आरोप आहे.

FIR Against Manager of Virat Kohlis One8 Commune In Bengaluru
David Warner : 'मला खेळायचं...', स्टार खेळाडूने निवृत्तीतून घेतला यू-टर्न? बोर्डाला केली अपील

पोलिसांनी सांगितले की, मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याचीही तक्रार

डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, रात्री मोठ्या आवाजात गाणी वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या आहेत.

FIR Against Manager of Virat Kohlis One8 Commune In Bengaluru
International Players : आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिलासा; प्रोत्साहनपर पारितोषिकाच्या निकषात बदल

पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल

पब फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, असेही पोलिसांनी सांगितले. यापेक्षा जास्त वेळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित one8 कम्युन पब चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. 6 जुलै रोजी, वन8 कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाजाच्या वेळेच्या पलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com