

Fire in Football match: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एक भायनक घटना घडली. फुटबॉल सामन्याआधी आयोजकांनी फटाके फोडले, हे फटाके हजारो प्रेक्षकांमध्ये उडाले आणि जवळपास ३० लोक जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींमध्ये बहुतांश मुले असून दोन प्रेक्षकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.