
Five percent reservation for wrestlers in state banks :कुस्ती या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्यस्तरीय मातीवरील आणि गादीवरील कुस्ती स्पर्धांमधील विशेष कामगिरी करणाऱ्या मल्लांना बँकेच्या सेवेत पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली. त्यासाठी बँकेने त्यांच्या सेवा नियमात बदल केले आहेत. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विविध गटांमधील सुवर्णपदक विजेत्यांसाठी तसेच महाराष्ट्र केसरी अथवा हिंदकेसरी पुरस्काराने गौरवलेल्या कुस्तीगीरांना या राखीव जागांचा लाभ मिळेल.