esakal | अंतराळवीरांचे यानातच फुटबॉल प्रात्यक्षिक
sakal

बोलून बातमी शोधा

अंतराळात सहकाऱ्यासह फुटबॉल खेळताना श्‍काप्लेरोव (समोरील)  (छायाचित्र सौजन्य ट्‌विटर)

अंतराळवीरांचे यानातच फुटबॉल प्रात्यक्षिक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अस्ताना (काझाकस्तान) - दहा दिवसांवर असलेल्या फुटबॉल विश्‍वकरंडकाचा ज्वर आतापर्यंत केवळ जगभरातच नाही, तर थेट अंतराळातही पोचला आहे. रशियाचा अंतराळवीर ॲन्टॉन श्‍काप्लेरोव आज विश्‍वकरंडक वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलसह पृथ्वीवर परतणार आहे. विशेष म्हणजे श्‍काप्लेरोव याने आपल्या सहकाऱ्यासह यानातच फुटबॉल खेळाचा आनंददेखील लुटला. 

रशियाच्या स्पेस एजन्सी ‘रोस्कोमॉस’ने दिलेल्या माहितीनुसार श्‍काप्लेरोव, अमेरिकेचा स्कॉट टिंगल आणि जपानचा नरिशिगे कनाई हे अंतराळवीर सोयुझ एमएस-०७ या अंतराळयानातून कुठल्याही क्षणी पृथ्वीवर परतील. अंतराळात १६८९ दिवस घालवल्यानंतर ही जोडी पृथ्वीवर परतत आहे. विशेष म्हणजे विश्‍वकरंडक स्पर्धेत वापरल्या जणाऱ्या आदिदास टेलस्टार १८ या फुटबॉलसह श्‍काप्लेरोव याने आपला अन्य सहकारी ओलेग अर्टेमयेव याच्यासह यानात फुटबॉलचा सराव केल्याचा एक व्हिडिओदेखील ‘रोस्कोसमॉस’ने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 

रशियन न्यूज एजन्सी ‘टास’ने अंतराळवीरांनी यानात सराव केलेला फुटबॉल विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या सामन्यात वापरण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, याला ‘फिफा’कडून अजून दुजोरा देण्यात आला नाही. विविध शास्त्रीय प्रयोग करण्यासाठी श्‍काप्लेरोव, टिंगल आणि कनाई यांनी पाच महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवला आहे.

अंतराळातील एका केंद्रावरील रोबोटिक आर्म बदलण्यासाठी प्रथमच अंतराळात आलेल्या टिंगल यांनी पहिल्यास प्रयत्नांत यशस्वी स्पेस वॉकदेखील केला.

loading image
go to top