कतारमध्ये 'नाद खुळा पिवळा निळा'; वर्ल्डकप मध्ये झळकला कोल्हापूरच्या PTM चा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fifa World Cup Qatar

Fifa World Cup: कतारमध्ये 'नाद खुळा पिवळा निळा'; वर्ल्डकप मध्ये झळकला कोल्हापूरच्या PTM चा झेंडा

FIFA World Cup 2022 : फुटबॉलवरील प्रेम अनेक कोल्हापूरकरांना थेट कतारला घेऊन चालले आहे. शहर व जिल्ह्यातील अनेकांनी फुटबॉल विश्‍वचषकाचा साक्षीदार होऊन ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेतली. नोकरी व्यवसायानिमित्त कतारमध्ये असलेल्या कोल्हापूरकरांनी मैदानावर हजेरी लावली. सोबतच कोल्हापूरमधून सामना पाहण्यासाठी काहींनी कतार गाठले. या वेळी देशाचा तिरंगा, स्थानिक मंडळाचा झेंडा फडकवण्यात आला.

हेही वाचा: IND vs NZ : 'एखाद्याला राग आला तरी...', धवनच्या वक्तव्याने संघात खळबळ

कोल्हापुरातील स्थानिक मंडळ असणारे पाटाकडील तालीम मंडळाचा झेंडा अमेय देसाई यांनी फडकवला, तर भरतेश कळंत्रे, प्रशांत कळंत्रे (दोघेही मलकापूर, सध्या कतार), प्रीतम मेक्कळकी, सौजन्य रोटे, शुभम रोटे (कोल्हापूर सध्या दुबई), इंद्रजित रोटे (कोल्हापूर), सुयश चौगुले(इचलकरंजी), गौरी कळंत्रे (मलकापूर, सध्या कतार), हेमलता दुगे (कोल्हापूर), सुनित कळंत्रे (कोल्हापूर), अनुज बोरगावे (गडहिंग्लज) यांनी मैदानावर हजेरी लावली.