Football News Blue Card : फुटबॉलमधील कार्डचे नियम बदलले! पिवळ्या, लालनंतर आता निळ्या कार्डची चर्चा

Football News Blue Card : फुटबॉल सामन्यादरम्यान रेफ्री दाखवणार नवं कार्ड
Football News Blue Card
Football News Blue Card esakal

Football News Blue Card : आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्ड (IFAB) ने सामन्यादरम्यान खेळाडूंना दाखवण्यात येणाऱ्या कार्डचे नियम बदलले आहेत. आता रेफ्री लाल, पिवळ्यासह निळे कार्ड देखील खेळाडूंना दाखवणार आहे. जर एखाद्या खेळाडूने गंभीररित्या फाऊल केला किंवा रेफ्रीच्या निर्णयावर खूप तीव्रपणे नाराजी व्यक्त केली तर हे निळे कार्ड दाखवून खेळाडूला 10 मिनिटासाठी सामन्यातून बाहेर काढण्यात येईल.

Football News Blue Card
Shreyas Iyer IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, मधल्या फळीतील फलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

नव्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान दोन निळे कार्ड दाखवण्यात आले किंवा एक निळे आणि एक पिवळे कार्ड मिळाले तर त्याला मैदानाबाहेर काढण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला फुटबॉल जगतातील मोठ्या स्पर्धांमध्ये अजून हा नवा नियम लागू करण्यात येणार नाहीये. सध्या या नियमाची चाचणी एफए कप आणि महिला एफए कपमध्ये केली जाईल. निळ्या कार्डचा नियम हा सध्या वेल्समधील कनिष्ठ स्तरावरील फुटबॉल स्पर्धांमध्ये वापरण्यात येत आहे.

Football News Blue Card
Mohammed Shami On Jai Shri Ram : ...तर जय श्रीराम म्हणण्यास काय हरकत आहे, शमीचं रोखठोक उत्तर

गेल्या वर्षी पोर्तुगालमध्ये झालेल्या महिला डर्बी स्पर्धेत बेनफिका आणि स्पोर्टिंग लिसबोन यांच्यातील सामन्यात रेफ्रींनी पांढरे कार्ड वापरले होते.

फिफा वर्ल्डकप 1970 पासून रेफ्रींनी फुटबॉलमध्ये पिवळे आणि लाल कार्ड वापरण्यास सुरूवात केली. त्यानंतर गेल्या वर्षी पांढरे कार्ड वापरण्यात आले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com