UEFA Champions League : UEFA ग्रुप स्टेजचं वेळापत्रक जाहीर, वाचा कोण कोणाबरोबर भिडणार?

football uefa champions league
football uefa champions leaguesakal

UEFA Champions League : UEFA ग्रुप स्टेजच वेळापत्रक इस्तंबुल येथे जाहीर झालं आहे. UEFA Champions League ची ग्रुप स्टेज A, B, C, D, E, F, G अशा आठ ग्रुपमध्ये होणार आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 संघांचा समावेश आहे. (UEFA Champions League Group Stage Draw)

गतवर्षीच्या फायनलमध्ये लिव्हरपूलला १-० ने पराभूत केल्यानंतर रियल माद्रिद युरोपातील एलिट क्लबवर वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियन क्लबवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु युक्रेनने घरगुती हंगामा सुरू केले आहे.

बायरेन म्युनिच आणि बार्सिलोना एकाच गटात आहेत. मँचेस्टर सिटी आणि बॉरूसा डॉर्टमंड हे देखील एकाच गटात आहेत. त्यामुळे अर्लिंग आपला जुना क्लब मँचेस्टर सिटीविरूद्ध खेळणार आहे. बॅयरन आणि बार्सिलोना यांच्याबरोबर ग्रुप C मध्ये इंटर मिलान आणि व्हिक्टोरिया प्लेझेन या संघाचा देखील समावेश आहे. 2020 मध्ये क्वार्टर फायलन सामन्यात बायरेनने बार्सिलोनाचा 8 - 2 असा पराभव केला होता.

आता बार्सिलोनाकडे 34 वर्षाचा फुटबॉलर लेवांडस्की आहे. त्याला क्लबने 50 लाख युरोजला विकत घेतले आहे. त्याने बायरेनकडून 8 वर्षात 344 गोल गेले आहेत. आता तो यंदाच्या हंगामात बायरेनविरूद्धच आपले दंड थोपटणार आहे.

या मोसमातील गट टप्प्यातील पहिल्या फेरीचे सामने 6 आणि 7 सप्टेंबर रोजी होणार आहेत. सगळे सहा मॅचडे हे नऊ आठवड्यांच्या स्पॅनमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यामुळे ग्रुप स्टेज नेहमीपेक्षा लवकर संपणार म्हणजे 1 नोव्हेंबरला संपणार आहे. UEFA ला ग्रुप स्टेज 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी संपवणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com