BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?

Thane Badminton Academy: ठाणे बॅडमिंटन अकादमीत आता परदेशातील युवा खेळाडूही प्रशिक्षणासाठी दाखल होत आहेत. मालदीव, आयर्लंड, स्पेन आणि अमेरिकेतील खेळाडूंनी प्रगत प्रशिक्षणासाठी ठाण्याला पसंती दिली आहे.
BADMINTON

BADMINTON

esakal

Updated on

मुंबई : मागील चार दशके राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार खेळाडू घडवणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकादमीत आता परदेशातील युवा खेळाडूंची पावले पडू लागली आहेत.

महाराष्ट्र व देशातील कानाकोपऱ्यांमधून असंख्य खेळाडूंसोबत आता जगभरातील खेळाडूही प्रगत प्रशिक्षणासाठी ठाणे बॅडमिंटन अकादमीची निवड करीत असून, अकादमीची गुणवत्ता आणि प्रशिक्षण पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी दाद मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com