Prakash Poddar : बीसीसीआयकडे धोनीची शिफारस करणाऱ्या प्रकाश पोद्दारांनी 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Poddar

Prakash Poddar : बीसीसीआयकडे धोनीची शिफारस करणाऱ्या प्रकाश पोद्दारांनी 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prakash Poddar : बंगालचे माजी फलंदाज आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे टॅलेंट स्पॉटर प्रकाश पोद्दार यांचे 82 व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले. प्रकाश पोद्दारांनीच बीसीसीआयला विकेटकिपर म्हणून महेंद्रसिंह धोनीच्या नावाची शिफारस केली होती. प्रकाश पोद्दार यांनी बंगाल आणि राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. ते 1960 च्या दशकात एक दर्जेदार फलंदाज म्हणून ओखले जायचे. त्यांनी 1962 मध्ये इंग्लंडविरूद्ध भारतात झालेल्या मालिकेत भारतीय संघात स्थान मिळवले होते.

हेही वाचा: Abu Dhabi T10 Fixed : रसेल - पोलार्ड अडकणार चौकशीच्या भोवऱ्यात? T10 लीग ICC अँटी करप्शनच्या रडारवर

पोद्दार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 शतके ठोकली आहेत. पोद्दार आणि त्यांचे साथीदार राजू मुखर्जी यांनी बीसीसीआयच्या टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विंगचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांच्याकडे महेंद्रसिंह धोनीच्या नावाची शिफार केली होती.

याबाबत सांगताना वरिष्ठ पत्रकार मकरंद वयंगंकर म्हणाले की, 'प्रकाश पोद्दार आणि राजू मुखर्जी यांनी त्यावेळी टॅलेंट डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये येत धोनीबद्दल वेंगसरकरांना सांगितले होते. त्यावेळी धोनी जमशेदपूरमध्ये बिहारकडून रणजी ट्रॉफी सामना खेळत होता. त्यावेळी झारखंड क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयचा दर्जा मिळाला नव्हता.' (Sports Latest News)

हेही वाचा: Sania Mirza : अखेर ठरलं! सानिया मिर्झा फेब्रुवारीत घेणार मोठा निर्णय

वेंगसरकर याबाबत म्हणाले की, 'पीसी दा (प्रकाश पोद्दार) यांना असे वाटले की जबरदस्त हँड - आय कोऑर्डिनेशन असलेला हा पूर्वेकडील खेळाडूला बीसीसीआयने अजून पैलू पाडण्याची, त्याला तयार करण्याची गरज आहे. बाकी पुढच्या गोष्टी सर्वांना माहितीच आहेत.' एमएस धोन : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात देखील प्रकाश पोद्दार यांच्या नावाचा ओझरता उल्लेख झाला आहे.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....