esakal | 33 वर्षीय माजी रणजीपटूचे निधन, मुंबईविरुद्ध खेळला अखेरचा सामना

बोलून बातमी शोधा

Ashwin Yadav
33 वर्षीय माजी रणजीपटूचे निधन, मुंबईविरुद्ध खेळला अखेरचा सामना
sakal_logo
By
टीम ई सकाळ

हैदराबाद: क्रिकेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादचा माजी जलदगती गोलंदाज अश्विन यादव (Ashwin Yadav) याचे शनिवार ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. तो 33 वर्षांचा होता. त्याच्यामागे पत्नी आणि तीन मुले आहेत. अश्विनने 2009 मध्ये अखेरची मॅच खेळली होती. 2007 मध्ये मोहालीच्या मैदानात पंजाब विरुद्धच्या सामन्यातून त्याने रणजीमध्ये पदार्पण केले होते. प्रथम श्रेणीतील 14 सामन्यात त्याने 34 विकेट घेतल्या आहेत. उप्पल स्टेडियमवर 2008-09 च्या हंगामात त्याने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 52 धावा खर्च करुन 6 विकेट घेतल्या होत्या. ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली होती.

क्रीडा जगतातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मुंबई विरुद्ध 2009 मध्ये अश्विन यादवने रणजीतील अखेरचा सामना खेळला होता. रणजीपटू यादव स्थानिय लीगमध्ये स्टेट बॅक ऑफ हैदराबाद आणि एसबीआयसाठी खेळत होता. त्याने 10 लिस्ट ए आणि दोन टी-20 मॅचही खेळल्या आहेत. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधरने यादवच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अश्विन यादवच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. तो हसतमुख स्वभावाचा हा खेळाडू सर्वांच्यात मिळून मिळून मिसळून राहायचा. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. तसेच कुटुंबियांना धर्ये मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केलीये. अश्विन आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही, अशी भावूक प्रतिक्रिया ऑफ स्पिनर विशाल वर्मा याने दिली आहे.