धक्कादायक! व्हीबी चंद्रशेखर यांनी आत्महत्या केलीये, पोलिसांचे शिक्कामोर्तब 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. मात्र, पोलिसांनी आता त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पषट केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

चेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. मात्र, पोलिसांनी आता त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पषट केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. 

चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा मृतदेह बेडरुमच्या फॅनला लटकलेल्या अवस्थेत सापडला. 

''चंद्रशेखर यांच्या पत्नीने बेडरुमचे दार वाजवले होते मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने खिडकीचा वापर केला असता त्यांना त्यांचा मृतदेह फॅनला लटकलेला आढळला,'' असे पोलिस अधिकारी मुरुगन यांना एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले

चंद्रशेखर यांनी चेन्नई सुपर किंग्जचे मॅनेजर, तामिळनाडूचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. क्रिकेटवर्तुळात ‘व्हीबी’ या नावाने परिचित असलेल्या चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. आक्रमक फलंदाज असलेल्या चंद्रशेखर यांनी सात एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर १९८८मध्ये तामिळनाडूला रणजी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. 

नंतर प्रशिक्षणाकडे आणि समालोचनाकडे वळलेल्या चंद्रशेखर यांनी बराच काळ राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पहिली तीन वर्षे त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former India Batsman VB Chandrasekhar Committed Suicide Confirms Police