धोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्यामागचे कनेक्शन?

MS Dhoni and Sakshi Dhoni
MS Dhoni and Sakshi DhoniInstagram

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad In Pune) परिसरात नवे घर खरेदी केले आहे. मुळचा रांचीत वास्तव्यास असलेल्या धोनीने यापूर्वी मुंबईतही घर घेतल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता धोनीने पिंपरी-चिंचवडनध्ये नवे घर खरेदी केले आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून तो अद्यापही क्रिकेटचा आनंद घेत आहे. (former indian captain mahendra singh dhoni buy new home in pimpari chinchwad in Pune)

धोनीचं पुणे शहराबाबत असलेले कनेक्शन

पुण्यात ठिकाणी घर खरेदी करुन त्याने पुण्याविषयी असणारे प्रेमच दाखवून दिले आहे. धोनी आणि पुणे शहर यांच्यात खास कनेक्शनही आहे. आयपीएलमध्ये त्याने पुणे सुपर जाएंट्स संघाचे नेतृत्व देखील केले आहे. एवढेच नाही तर 2018 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे घरचे मैदान हे पुणेच होते. त्यामुळेच कदाचित धोनीने पुण्यात घर घेण्याला पसंती दिली असावी. रावेत परिसरातील एस्टाडो प्रेसिडेंशियल सोसायटीमध्ये धोनीने हे नवे घर घेतल्याचे समजते.

मुंबईतही घर बांधणी

पुण्याशिवाय महेंद्र सिंह धोनीने मुंबईतही घर बांधत आहे. मुंबईतील अलिशान घराच्या बांधकामाचे काही फोटो यापूर्वी समोर आले होते. धोनीची पत्नी साक्षी धोनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुंबईतील घराच्या बांधकामाचे काही फोटो शेअर केले होते.

देशातील कोरोनाच्या वाढत्या संकटातही आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. बायोबबलच्या वातावरणात सुरु असलेली स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. केकेआरसह चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील काही जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीही केल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने हे युएईच्या मैदानात घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात त्याचा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com