'तु वनडे खेळू नकोस', रवि शास्त्रींचा पांड्याला सल्ला

रवी शास्त्री यांनी सध्या फॉर्मात असणाऱ्या हार्दिक पांड्याला वनडे न खेळण्याचा दिला सल्ला
'तु वनडे खेळू नकोस', रवि शास्त्रींचा पांड्याला सल्ला
esakl

टीम इंडिया विरुद्धा साऊथ अफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी २० सीरीज ९ जून पासून सुरु होणार आहे. या सीरीजसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात काही युवा खेळाडूंना संधी दिली आहे तर काही खेळाडूंचे पुनरागमन झाल आहे. दरम्यान, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सध्या फॉर्मात असणाऱ्या हार्दिक पांड्याला वनडे न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात ऑलराऊंडर आता वनडे खेळणार नसल्याची चर्चा रंगली आहे.

यंदाच्या आयपीएल १५ व्या सीझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली नवख्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे पांड्याचे साऊथ अफ्रिकाविरुद्ध होणाऱ्या टी २० सीरीजमध्ये पुनरागमन झालं आहे. मात्र, शास्त्री यांनी पांड्याला वनडे न खेळण्याचा सल्ला दिला आहे.

'तु वनडे खेळू नकोस', रवि शास्त्रींचा पांड्याला सल्ला
'भारताला दोन वर्षात कर्णधाराची गरज लागली तर पांड्या असेलच'

यंदाच्या वर्षी शेवटी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी काही महिने केवळ पांड्याने टी २० क्रिकेट खेळलं पाहिजे. त्याने स्वतःच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. असे मत शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे.

स्टार स्पोर्टशी संवाद साधताना शास्त्री यांनी पांड्याच्या खेळावर भाष्य केलं. माझ्यासाठी पांड्या एक फलंदाज एक ऑलराऊंडच्या रुपात टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल. मला वाटत नाही की तो इतका दुखापतग्रस्त आहे की तो 2 षटकेही टाकू शकत नाही. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे आणि ती सुरू ठेवली पाहिजे. वर्ल्ड कपमध्ये जाण्यासाठी त्याने फक्त टी-२० क्रिकेट खेळावे. त्याने वनडे खेळण्याचा धोका पत्करू नये. असा सल्ला शास्त्री यांनी यावेळी पांड्याला दिला.

'तु वनडे खेळू नकोस', रवि शास्त्रींचा पांड्याला सल्ला
37 वर्षांपूर्वीची ऑडी कार पाहून रवी शास्त्री झाले भावूक

हार्दिक पांड्याने 8 नोव्हेंबर रोजी विश्वचषकात निमिबियाविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. या सामन्यानंतर तो आयपीएल 2022 मध्ये दिसला. आयपीएलच्या या हंगामात त्याने 131 च्या स्ट्राइक रेटने 487 धावा केल्या आणि 8 विकेट्सही घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वांच्या नजरा पांड्यावर असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com