esakal | '...तर पाकचे खेळाडू शौचालयही साफ करतील'
sakal

बोलून बातमी शोधा

Former Pakistan players willing to work in toilets if PCB employs them says Tanveer Ahmed

'...तर पाकचे खेळाडू शौचालयही साफ करतील'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कराचीः पाकिस्तानच्या काही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर ते शौचालयही साफ करण्याचे काम करतील, असे वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कसोटीपटू तन्वीर अहमद याने केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना तन्वीर अहमद म्हणाला, 'पाकिस्तानचे माजी खेळाडू क्रिकेट बोर्डात काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की त्यांना शौचालय साफ करण्याची संधी मिळाली तर ते कामही ते करतील. अर्थात, हे माझे वैय्यक्तिक मत आहे. पण, यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.'

तन्वीर अहमदने आपल्या मुलाखतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि निवड समितीप्रमुख इंझमाम उल-हक याला टिकेचं लक्ष्य बनवले. इंझमाने आतापर्यंत संघ निवड करताना नेहमी घराणेशाही दाखवलेली आहे. निवड समिती प्रमुख म्हणून त्याने केलेले एक चांगलं काम मला सांगा, माझ्या दृष्टीने तो महान खेळाडू नाही.' असेही तन्वीर अहमद म्हणाला.

तन्वीर अहमदच्या मुलाखतीनंतर व्हायरला झालेल्या व्हिडिओवर टीका करण्यात आली आहे. तन्वीर अहमद हा मानसिक रुग्ण असल्याचे पाकिस्तानी नेटिझन्सनी म्हटले आहे. यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला तन्वीर अहमदने डिवचलं होतं.

दरम्यान, 2010-2013 या काळात तन्वीर अहमदने पाकिस्तानकडून 5 कसोटी, एक टी-20 आणि 2 वन-डे सामने खेळला आहे.

loading image
go to top