क्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल

अपेक्षेप्रमाणे रंगतदार झालेल्या मेगा सेमी फायनलमध्ये नोव्हाकने क्ले कोर्टवर दबदबा असलेल्या नदालला 3-6, 6-3, 7-6, 6-2 अशा फरकाने पराभूत केले.
क्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल

French Open 2021 : क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदालला शह देत टेनिस जगतातील नंबर वन नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपनची फायनल गाठली. सहाव्यांदा त्याने फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. अपेक्षेप्रमाणे रंगतदार झालेल्या मेगा सेमी फायनलमध्ये नोव्हाकने क्ले कोर्टवर दबदबा असलेल्या नदालला 3-6, 6-3, 7-6 (4), 6-2 अशा फरकाने पराभूत केले. ही लढत 4 तास 11 मिनिटे रंगली होती. आम्ही दोघ एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो त्यामुळे सामन्यात काहीही होऊ शकते, असे या सामन्यापूर्वी नदालने म्हटले होते. फ्रेंच ओपनमध्ये विक्रमी 14 वी सेमीफायनल खेळणाऱ्या नदालचा त्याने गाशा गुंडाळायला लावला. फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये नदालला पराभूत करण्याचा पराक्रम जोकोव्हिचने आपल्या नावे केला. नदालने विक्रमी 13 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. आतापर्यंत सेमी फायनलमध्ये त्याला कोणीही पराभूत केलेले नव्हते.

नदालने पहिला सेट 6-3 असा खिशात घातला. नंबर वन जोकोव्हिचने दुसरा सेट तेवढ्याच फरकाने जिंकून कांटे की टक्कर देण्यास कमी पडणार नाही, याची झलक दाखवून दिली. दुसरा सेट जोकोव्हिचने 6-3 असा आपल्या नावे केला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही दोघांकडून जबरदस्त रॅलीसह कमालीचे फटके आणि चतुराईचा खेळ पाहायला मिळाला. अतिशय रंगतदार झालेल्या हा सेट 7-6 असा जिंकत जोकोव्हिचने नदालला पुन्हा बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर नदालने 6-2 असा सेट आपल्या नावे करत फायनल तिकीट पक्के केले.

क्ले कोर्टच्या बादशहाला शह देत जोकोव्हिचने गाठली फायनल
French Open : अखेर 'त्सित्सि' सेमीफानलमध्ये 'पास'

नदाल फ्रेंच ओपनची विक्रमी 14 व्या सेमीफायनलमध्ये उतरला होता. तर जोकोव्हिचचा या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा 11 वा सामना होता. एकंदरीत ग्रँडस्लॅमचा विचार केल्यास जोकोव्हिच हा 40 वा तर नदालचा 35 वी सेमीफायनल होती. या सामन्यातील विजयाह आतापर्यंतच्या 59 लढतीत जोकोव्हिचने 30-28 अशी आघाडी घेतली आहे. ग्रँडस्लॅममध्ये नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात आता 10-7 असे अंतर असून फ्रेंच ओपनमध्ये दोघांमधील विजयात आता 7-2 असे अंतर आहे. या सामन्यातील पराभवामुळे राफेल नदालला आता विक्रमी ग्रँडस्लॅमसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार असून जोकोव्हिच कारकिर्दीतल्या 19 व्या ग्रँण्डस्लॅमसाठी फायनल खेळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com