फ्रेंच ओपन : अग्रमानांकित नाओमीवर सिनीयाकोवाचा विजय 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

नाओमीला आधीच्या दोन फेऱ्यांत एका सेटच्या पीछाडीवरून संघर्ष करावा लागला होता. या वेळी मात्र तिला प्रतिआक्रमण करता आले नाही. 

पॅरिस : अग्रमानांकित जपानच्या नाओमी ओसाकाला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत तिसऱ्या फेरीतच पराभूत व्हावे लागले. चेक प्रजासत्ताकाच्या कॅटरीना सिनीयाकोवाकडून ती 4-6, 2-6 अशी हरली. 

सिनीयाकोवा जागतिक क्रमवारीत 42व्या क्रमांकावर आहे. नाओमीकडून 38 वेळा सोपे फटके चुकले. याचाच तिला फटका बसला. या पराभवामुळे सलग तिसरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या तिच्या आशा संपुष्टात आल्या. यापूर्वी तिने यंदा ऑस्ट्रेलियन ओपन; तर गेल्या वर्षी अमेरिकन विजेतेपद मिळविले होते. 

नाओमीला आधीच्या दोन फेऱ्यांत एका सेटच्या पीछाडीवरून संघर्ष करावा लागला होता. या वेळी मात्र तिला प्रतिआक्रमण करता आले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: French Open Naomi Osaka Loses in the Third Round