Sreesanth Vs Gambhir : शेवटी संस्कार महत्वाचे... गंभीर प्रकरणावर श्रीसंतच्या पत्नीची कमेंट व्हायरल

Sreesanth Vs Gambhir
Sreesanth Vs Gambhiresakal

Sreesanth Vs Gambhir : भारताचे दोन माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि एस. श्रीसंत हे लेजंड क्रिकेट लीगमध्ये एकमेकांना भिडले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही क्रिकेटपटूंची वादाची पार्श्वभूमी असल्याने हा विषय जास्तच वाढला.

श्रीसंतने गंभीवर शिवीगाळ करणे आणि मॅच फिक्सर म्हणून संबोधल्याचा आरोप केला. त्यावर गंभीरने फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता या वादात श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने उडी घेतली आहे. तिने गंभीरचे थेट संस्कारच काढले.

Sreesanth Vs Gambhir
AUS vs PAK : वांशिक शिवीगाळ? पाकिस्तानच्या सराव सामन्यात ब्रॉडकास्टरनं केली मोठी चूक अन् वादाला फुटलं तोंड...

श्रीसंतने आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत गंभीरसोबत लेजंड क्रिकेट लीगमध्ये का वाद झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने दावा केला की गंभीरने त्याला शिवीगाळ करत मॅच फिक्सर असं संबोधलं. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांच्या उलट सुलट सुरू होत्या.

Sreesanth Vs Gambhir
Rahul Dravid : शारीरिक ताकद नाही तर... कोच राहुल द्रविड दक्षिण अफ्रिका दौरा सर्वात आव्हानात्मक असं का म्हणाला?

दरम्यान, श्रीसंतने त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टवर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी श्रीसंतने देखील प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'श्रीकडून हे सर्व ऐकल्यानंतर मला धक्कात बसला. भारताकडून जो खेळाडू तुमच्यासोबत इतके वर्ष खेळला तो या पातळीवर घसरला आहे ते ही निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनी हे घडतंय.'

'शेवटी संस्कार खूप महत्वाचे आणि ते मैदानावरील अशा प्रकारच्या वर्तणुकीवरून दिसून येतात. खूप धक्कादायक.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com