गौतम गंभीरने बिशनसिंग बेदी, चेतन चौहानला सुनावले 

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गंभीरने सैनीमधील गुणवत्ता खूप आधी ओळखली होती. त्याच्या गोलंदाजीने प्रभावित होऊन 2013 मध्ये त्याला दिल्ली रणजी संघात स्थान दिले होते. मात्र, त्या वेळी दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले बेदी आणि सदस्य चैहान यांनी सैनीच्या निवडीस आक्षेप घेतला होता.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातील पहिल्याच टी 20 सामन्यात नवोदित वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सामन्याचा मानकरी ठरल्यावर भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने बिशनसिंग बेदी आणि चेतन चौहान यांना लक्ष्य करत "बघतायं ना, तोच सैनी आज सामन्याचा मानकरी ठरलायं.' अशी टिका केली. 

गंभीरने सैनीमधील गुणवत्ता खूप आधी ओळखली होती. त्याच्या गोलंदाजीने प्रभावित होऊन 2013 मध्ये त्याला दिल्ली रणजी संघात स्थान दिले होते. मात्र, त्या वेळी दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले बेदी आणि सदस्य चैहान यांनी सैनीच्या निवडीस आक्षेप घेतला होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पदार्पणातच सैनीने सामन्याचा मानकरी किताब पटकाविल्यावर गंभीर ने या दोन्ही माजी क्रिकेटपटूंवर ट्‌विटरच्या माध्यामातून टिका केली.

"सैनी गोलंदाजी सुरू करण्यापूर्वीच तो दोन विकेट मिळविल्या आहेस. या दोघांनी तुझ्या कारकिर्दीविषयी संशय घेतला होता. आज हे दोघेही तुझ्या कामगिरीने स्वतःवरच चिडले असतील. तुझे अभिनंदन !'असा मजकूरप ट्‌विट करत गंभीरने सैनीचे अभिनंदन केले आहे. बैदी आणि चौहान यांना सैनीच्या कामगिरीतून उत्तर मिळाले असेल आणि माझा निर्णय देखील बरोबर होता हे आता पटले असेल. अर्थात, पटवून घेतले तर.' असे दुसरे ट्‌विट करून त्याने बेदी, चौहान यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही. 
सैनीच्या कारिकीर्दीत गंभीरला महत्त्वाचे स्थान आहे. सैनीने देखील यापूर्वी अनेकदा हे मान्य केले आहे. "मी काहीच नव्हतो, तेव्हा गंभीरने माझ्यावर टाकलेला विश्‍वासामुळेच मला उभारी आली,'असे सैनीने यापूर्वी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Gambhir criticize Bishansingh Bedi and Chetan Chauhan on Navdeep Saini bowling