Gautam Gambhir : गंभीरची होणार घरवापसी; लखनौ सुपर जायंट्सला देणार सोडचिठ्ठी?

Gautam Gambhir LSG KKR
Gautam Gambhir LSG KKResakal

Gautam Gambhir LSG KKR : बीसीसीआयचे माजी निवडसमिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची लखनौ सुपर जायंट्सने धोरणात्मक सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. लखनौने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठे बदल केले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदी जस्टीन लँगरने अँडी फ्लॉवरची निवड केली आहे.

दरम्यान, हिंदी वृत्तसंस्था दैनिक जागरण यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीर देखील आता लखनौ सुपर जायंट्सला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'अँडी फ्लॉवरनंतर आता गौतम गंभीर लखनौ सोडण्याची शक्यता आहे. या पलीकडे आम्ही आता तरी काही सांगू शकत नाही.' (Gautam Gambhir Lucknow Super Giants)

Gautam Gambhir LSG KKR
SRH New Coach: सनरायझर्स हैदराबादमधून ब्रायन लाराची हकालपट्टी, माजी दिग्गज खेळाडूची संघाच्या कोचपदी नियुक्ती

गौतम गंभीरची होणार घरवापसी?

गौतम गंभीरची घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गंभीर कोलकाता नाईट रायडर्सशी जोडला जाण्याची शक्यता आहे. गौतम गंभीर हा अनेक दिवसांपासून केकेआर संघ व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे.

गौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये महत्वाची भुमिका बजावल्यानंतर 2011 च्या लिलावात गंभीर हा केकेआरकशी जोडला गेला. आयपीएलमध्ये केकेआरने सुवर्णकाळ हा गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालीच पाहिला. (Kolkata Knight Riders)

केकेआरकडून चार हंगाम खेळणाऱ्या गंभीरने चांगल्या धावा केल्या. त्याने 2012 मध्ये केकेआरला विजेतेपद पटकावून दिले. त्यानंतर 2014 मध्ये केकेआरने पुन्हा विजेतेपद पटकावले. त्यावेळी देखील गंभीरच संघाचे नेतृत्व करत होता.

Gautam Gambhir LSG KKR
IPL 2024 : RCB संघात मोठा बदल, लखनऊ सुपर जायंट्सच्या दिग्गज खेळाडूची बंगळुरूमध्ये एंट्री

गौतम गंभीर सध्या युएसएमध्ये आहे. तो तेथे युएस मास्टर्स टी 10 लीगसाठी गेला आहे. तो युसूफ पठाणसोबत न्यू जर्सी ट्रिटॉन्सकडून खेळणार आहे.

या दोन खेळाडूंबरोबरच माँटी पानेसर, आरपी सिंह, एल्बे मार्कोल, लिम प्लंकेट, जेस्सी रायडर, क्रेग मॅकमिलन हे देखील सहभागी होणार आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com