Gautam Gambhir : लँगर 'लखनौ'वासी झाला आता गौतम गंभीर केकेआरमध्ये परतणार?

Gautam Gambhir LSG KKR
Gautam Gambhir LSG KKR esakal

Gautam Gambhir LSG KKR : लखनौ सुपर जायंट्सने नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि फलंदाज जस्टीन लँगरला आपला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. लखनौचा मेंटॉर म्हणून गौतम गंभीर काम पाहतो आहे.

संघ व्यवस्थापनातील या मोठ्या बदलानंतर गौतम गंभीरचं काय असं प्रश्न अनेकांना पडला होता. गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्सला सोडचिठ्ठी देऊन आपली जुनी आयपीएल फ्रेंचायजी कोलकाता नाईट रायडर्सकडे जाणार अशी चर्चा सुरू होती.

Gautam Gambhir LSG KKR
Ruturaj Gaikwad : वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगलं; ऋतुराज सर्व दुःख बाजूला सारून म्हणतो आता एकच लक्ष्य...

मात्र मिळालेल्या माहितीनुसार गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्स सोडून केकेआरवासी होण्याचा कोणता इरादा नाहीये. गेल्या दोन दिवसापासून गंभीर हा केकेआरचा कोच किंवा मेंटॉर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र याची शक्यता सूत्रांनी फेटाळून लावली आहे. (IPL News)

गौतम गंभीर आणि केकेआरचं (Kolkata Knight Riders) नातं तसं घट्ट आहे. कारण त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरने दोनदा आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्यातरी गौतम गंभीर हा कोठेही जाणार नाहीये.

तो लखनौ सुपर जायंट्स सोबतच असणार आहे.' आयपीएल 2024 चा हंगाम अजून सात महिने लांब आहे. गंभीर आणि लखनौकडे निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ आहे.

Gautam Gambhir LSG KKR
Asia Cup 2023 Schedule : पाकिस्तान आता पैशासाठी हटलं! आशिया कप वेळापत्रकाचं घोडं PCB मुळं अडलं

गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) सोडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. लखनौने अँडी फ्लॉवरचा करार संपल्यानंतर तो पुढे न वाढवता जस्टीन लँगरला आपला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. लँगरने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भुषवलं आहे.

सँड पेपर प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. त्याने 2018 - 19 मध्ये ऑस्ट्रेलियाला अॅशेस जिंकण्यात देखील मदत केली होती. याचबरोबर त्याच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 चा टी 20 वर्ल्डकप देखील जिंकला होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com