'अजिंक्य रहाणेने अनुभवाच्या जोरावर संघात स्थान मिळवले खरे पण...'

Ajinkya Rahane Gautam Gambhir
Ajinkya Rahane Gautam Gambhiresakal

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारतीय कसोटी संघाची (Indian Test Team) घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. या दौऱ्यासाठी कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याची खराब कामगिरीनंतरही निवड झाली. मात्र त्याने उपकर्णधारपद (Vice Captain) गमवाले. आता कसोटी संघाचे उपकर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आले आहे. अजिंक्य रहाणेवर खराब कामगिरीनंतर बरीच टीका झाली आहे. (Gautam Gambhir Statement Over Ajinkya Rahane Selection for South Africa Tour)

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) अजिंक्य रहाणेच्या संघातील स्थानाबाबत वक्तव्य केले. गंभीरच्या मते जरी अजिंक्य रहाणेने संघातील आपले स्थान टिकवले असले तरी त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अंतिम ११ च्या संघात खेळण्याची संधी मिळेल याची शाश्वती नाही.

गंभीर म्हणाला 'मला वाटते की अजिंक्य रहाणेला अंतिम ११ च्या संघात स्थान मिळणे अत्यंत कठीण आहे. तुमच्याकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आहे. भारतीय कर्णधाराला श्रेयस अय्यरने नुकत्याच केलेल्या कामगिरीनंतर डावलणे कठीण जाईल. याचबरोबर हनुमा विहारीनेही (Hnuma Vihari) दमदार कामगिरी केली आहे.'

गौतम गंभीर (Gautam Gambhir) पाठोपाठ संजय बांगर (Sanjay Bngar) यांनीही रहाणेच्या संघातील समावेशाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले 'अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील (India Tour Of South Africa) संघात स्थान मिळवले आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निवडला जाण्याची शक्याता होतीच कारण तुम्हाला नक्कीच दक्षिण आफ्रिकेत अनुभवाची गरज भासणार आहे. पण, त्याला पहिल्याच कसोटी सामन्यात अंतिम ११ च्या संघात स्थान मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com