Gautam Gambhir Reaction | IND vs NZ: भुवीला संघाबाहेर बसवा अन् 'या' खेळाडूला संधी द्या- गौतम गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam-Gambhir-Bhuvi-Team-India

मालिकेतला शेवटचा टी२० सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर

IND vs NZ: भुवीला बसवा अन् 'या' खेळाडूला संघात घ्या- गंभीर

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ, 3rd T20 : भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेत न्यूझीलंडवर २-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हे मैदान फलंदाजांना अनेकदा पोषक ठरल्याचं दिसलं आहे. पण गोलंदाजांसाठी आणि विशेषत: वेगवान गोलंदाजांसाठी हे मैदान नेहमीच फायद्याचे ठरते. त्यामुळे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आजच्या सामन्यासाठी एक बदल सुचवला आहे.

Team India

Team India

गौतम गंभीरने काही वर्षांसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वात KKR ने दोन वेळा IPL चे विजेतेपद मिळवले आहे. गंभीरला या मैदानाचा आणि पिचचा चांगलाच अंदाज आहे. त्यामुळे गौतम गंभीरने या सामन्यासाठी भारताचा अनुभवी वेगवान स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला संघातून वगळण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी त्याच्या जागी नवख्या आवेश खानला संधी देण्यात यायला हवी असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.

Gautam-Gambhir

Gautam-Gambhir

"गोलंदाजीचा विचार केला तर भुवनेश्वर कुमारला थोडी विश्रांती द्यायला हवी आणि त्याच्या जागी आवेश खानला संघात स्थान द्यायला हवं. कोलकाताच्या पिचकडून आवेश खानला नक्कीच मदत मिळेल. आवेश खानकडे चेंडूला वेग (Pace) आणि उसळी (Bounce) देण्याची कला आहे. त्यामुळे हे पिच त्याच्यासाठी फायदेशीर छरू शकते. त्यामुळे आवेश खानने सामना खेळावा असं मला मनापासून वाटतं. आवेश खानला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे", असं स्पष्ट मत गौतम गंभीरने व्यक्त केलं.

loading image
go to top