esakal | इम्रान खानवरील मिम्स शेअर करत जाफरचं प्रत्त्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

इम्रान खानवरील मिम्स शेअर करत जाफरचं प्रत्त्युत्तर

इम्रान खानवरील मिम्स शेअर करत जाफरचं प्रत्त्युत्तर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारताचा माजी फलंदाज आणि पंजाब किंग्स संघाचा विद्यमान फलंदाजी कोच वसीम जाफर (Wasim Jaffer)हटक्या पोस्टमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आपल्या हटके अंदाजात जाफर मिम्स शेअर करत समोरच्याची बोलती बंद करत असतो. जाफरचा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. या हटके अंदाजामुळे नेटकरी जाफरला 'मीम किंग' म्हणतता. भारतामध्ये ट्विटर बॅन होणार असल्याच्या अफवावर पंजाब किंग्सने एक ट्विट करत जाफरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण जाफरनं आपल्या खास अंदाजात पंजाबला प्रत्त्युत्तर देत बोलती बंद केली. (Ghabrana nahi hai: Wasim Jaffer responds to Punjab Kings' tweet on Twitter ban with hilarious Imran Khan meme)

भारतात ट्विटर बॅन होणार असल्याच्या अफवानं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. हाच धागा पकडत पंजाब किंग्स संघानं जाफरला ट्रोल करण्यासाठी एक मिम्स शेअर केलं. जाफरनेही इट का जबाव पथ्थर से या म्हणीप्रमाणे पंजाब संघाला प्रत्त्युत्तर दिलं. पंजाबने थ्री इडियट चित्रपटातील आमिर खानचा फोटो पोस्ट करत 'जाने नही देंगे' असं म्हणत जाफरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. जाफरने याला आपल्या खास अंदाज मीम्स शेअर करत उत्तर दिलं. जाफरनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याच्यावरील मिम्स शअर करत पंजाबची बोलती बंद केली.

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

दरम्यान, जाफर आयपीएल 2021 मध्ये पजांब किंग्स संघाचा फलंदाजी कोच राहिल आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आलं. आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.