Glenn Maxell : मार खाण्यातच प्रसिद्ध! मॅक्सवेलच्या शतकी तडाख्यात टीम इंडिया घायाळ त्यावर सुमार कॅप्टन्सीनं चोळलं मीठ

Glenn Maxell
Glenn Maxell esakal

India vs Australia 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताचे 223 धावांचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 फलंदाज राखून शेवटच्या चेंडूवर पार केले. कांगारूंकडून ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत नाबाद 104 धावा ठोकत एकहाती सामना जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून खाते उघडले असून भारताचा मालिका विजय अजून लांबणीवर पडला आहे.

भारताकडून ऋतुराज गायकवाडने नाबाद 123 धावांची शतकी खेळी केली होती. मात्र त्याची ही शतकी खेळी वाया गेली. भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा केला. प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकात 68 तर अर्शदीप सिंगने 4 षटकात 44 धावा दिल्या.

त्यातच स्लो ओव्हर रेटमुळे शेवटच्या षटकात भारताला 5 खेळाडू सर्कमध्ये देखील ठेवावे लागले. सूर्याचे गोलंदाजांचे नियोजन चुकले अन् शेवटच्या 2 षटकात ऑस्ट्रेलियाने 47 धावा चोपल्या.

Glenn Maxell
Ruturaj Gaikwad : ऋतूनं 'प्रिन्स'चं टेन्शन वाढवलं! पहिल्याच टी 20 शतकात विराट, रोहितसह सूर्यालाही मागं टाकलं

भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने देखील दमदार सुरूवात केली. सलामीवीर ट्रॅविस हेड आणि एरोन हार्डिये यांनी 4 षटकात 47 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र अर्शदीप सिंगने हार्डियेला 16 धावांवर बाद केलं.

त्यानंतर 18 चेंडूत 35 धावा करणाऱ्या हेडला आवेश खानने बाद केले. पाठोपाठ रवी बिश्नोईने जॉश इंग्लिसचा त्रिफळा उडवला. कांगारूंची अवस्था बघता बघता 3 बाद 68 धावा अशी झाली होती.

मात्र त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची आक्रमक भागीदारी रचली. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवणार असं वाटत असतानाच अक्षर पटेलने स्टॉयनिसला बाद केलं.

स्टॉयनिस बाद झाल्यावर कांगारू बॅकफूटवर जातील असा अंदाज होता. कारण बिश्नोईने टीम डेव्हिडला देखील आल्या पावली माघारी धाडलं होतं मात्र मॅक्सवेलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने तुफान फटकेबाजी करत सामना जवळ आणला. तो आपल्या शतकाजवळ पोहचला होता. त्याने सामना 12 चेंडूत 47 धावा असा आणला.

Glenn Maxell
Ind vs Aus 3rd T20 : ग्लेन मॅक्सवेलचे दमदार शतक, शेवटच्या चेंडूवर चौकार मारत जिंकून दिला सामना

शेवटच्या 12 चेंडूत झाल्या 47 धावा

जरी हे आव्हान मोठं असलं तरी त्याने मॅथ्यू वेडने 19 व्या षटकात अक्षरला पहिल्या तीन चेंडूतच 10 धावा केल्या. त्यानंतर वेडने नो बॉलच्या फ्री हिटवर षटकार आणि पुढच्या दोन चेंडूवर 5 धावा झाल्या. पटेलच्या 19 व्या षटकात तब्बल 22 दावा वसूल झाल्या.

त्यानंतर शेवटचे षटक टाकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाच्या हातात 21 धावा होत्या. स्लो ओव्हर रेटमुळे शेवटच्या षटकात 5 खेळाडू सर्कलमध्ये ठेवणे गरजेचे होते.

प्रसिद्धचे शेवटचे षटक

  • 6 चेंडूत 21 धावा - पहिला चेंडू - मॅथ्यू वेडने चौकार मारला,

  • 5 चेंडूत 14 धावा - दुसरा चेंडू - मॅथ्यू वेडची एक धाव

  • 4 चेंडूत 16 धावा - तिसरा चेंडू - मॅक्सेवलचा षटकार

  • 3 चेंडूत 10 धावा - चौथा चेंडू - मॅक्सवेलचा चौकार

  • 2 चेंडूत 6 धावा - पाचवा चेंडू - मॅक्सवेलचा अजून एक चौकार, शतक पूर्ण

  • 1 चेंडू 2 धावा - सहावा चेंडू - मॅक्सवेलच्या चौकारासह भारताचा पराभव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com