cristiano ronaldo
sakal
दुबई - पोर्तुगालचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला फुटबॉलच्या रणांगणात एक हजार गोल करावयाचे आहेत. हेच ध्येय त्याने आगामी काळात डोळ्यांसमोर ठेवले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपले ध्येय दुबई येथील ग्लोब सॉकर पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलून दाखवले. ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या वक्तव्यानंतर तो अमेरिका, कॅनडा व मेक्सिको येथे होत असलेल्या विश्वकरंडकात पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.