esakal | चॅपल यांची दादावर पुन्हा 'दादागिरी'!
sakal

बोलून बातमी शोधा

चॅपल यांची दादावर पुन्हा 'दादागिरी'!

चॅपल यांची दादावर पुन्हा 'दादागिरी'!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचे माजी कोच ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानातील दादा आणि माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) वर टीका केलीय. सौरव गांगुली आपल्या चुका सुधारण्यापेक्षा संघावर आपले नियंत्रण ठेवण्यावर अधिक भर द्यायचा, असे वक्तव्य चॅपल यांनी केले आहे. 2005 ते 2007 दरम्यान ऑस्ट्रेलियन दिग्गजाने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी चॅपल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. (sourav ganguly not ready to work hard says greg chappell )

ग्रेग चॅपल यांनी सौरव गांगुलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. 2007 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा खेळ पहिल्या राउंडमध्येच खल्लास झाला. यावेळी चॅपल हेच भारतीय संघाचे कोच होते. क्रिकेट लाइफ स्‍टोरीज पोडकास्‍टमध्ये ग्रेग चॅपल यांनी भारतीय संघासोबत काम करणे सर्वात कठीण असल्याचे सांगितले. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धूरा सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सौरव गांगुली नेतृत्वामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. कठोर मेहनत न करता त्याला संघावर नियंत्रण ठेवायचे होते, असा धक्कादाय आरोप त्यांनी बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर केलाय.

हेही वाचा: Pink Ball Test: भारतीय महिला संघही 'प्रकाशझोतात'

राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि अन्य युवा खेळाडूंसोबत काम करणे अविस्मरणीय असल्याचेही ते म्हणाले. धोनीही यातील एक होता. राहुल द्रविडने टीम इंडियाला सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले, असेही चॅपल यांनी म्हटले आहे. ज्यावेळी सौरव गांगुलीला ड्रोप केले त्यावेळी खेळाडूंना आपलाही नंबर येऊ शकतो, अशी धास्ती निर्माण झाली होती, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: महिला क्रिकेटमध्ये कुणाला किती पॅकेज; पाहा संपूर्ण यादी

गांगुलीमुळेच चॅपल झाले होते कोच

भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यासंदर्भात सौरव गांगुलीने त्यांच्याशी संपर्क केला होता, या गोष्टीलाही त्यांनी उजाळा दिला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदपी जॉन बुकानन होते. भारतीय टीम ही क्रिकेट जगतातील एक मजबूत टीम होती. त्यामुळेच टीम इंडियाचा कोच होण्यास तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

loading image