कोरोनामुळे अनेक खेळांना फटका बसलाय; परंतु हा खेळ सुरूच राहणार! वाचा बातमी

कोरोनामुळे अनेक खेळांना फटका बसलाय; परंतु हा खेळ सुरूच राहणार! वाचा बातमी


मुंबई ः जिम्नॅस्टिक या खेळातच मूळचे सुरक्षित अंतर आहे. त्यात खेळाडूंचा एकमेकांशी क्वचितच संपर्क येतो. त्यामुळे एकदा सभागृह खुली झाल्यावर सराव सुरू करण्यात किंवा स्पर्धा घेण्यात अडचण येणार नाही; पण सरावाच्या अभावी नजीकच्या कालावधीत स्पर्धा अवघड आहेत, असे महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी यांनी सांगितले. 

डॉ. जोशी हे आशियाई जिम्नॅस्टिक्‍स युनियनच्या एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स तांत्रिक समितीचे सदस्य आहेत. जिम्नॅस्टिकमध्ये वैयक्तिक कौशल्य दाखवले जाते. त्याचबरोबर दोन खेळाडू कौशल्य दाखवत असताना त्यात वेळही असतो. त्यामुळे सुरक्षित अंतर असतेच. त्याचबरोबर खेळाडू आणि पंचातही अंतर असते. त्यामुळे सुरक्षित अंतर असतेच. आता या अंतरामुळे मास्कची गरज नाही, असे जोशी यांनी सांगितले. 

आता स्पर्धा होणार असलेल्या साधनांवर निर्जंतुकीकरण करावे लागेल. आता काही प्रकारांत खेळाडू ग्लोव्हज्‌ वापरतात. त्याचेही निर्जंतुकीकरण करावे लागेल. त्याचबरोबर स्पर्धक कसरत करण्यापूर्वी मॅग्निशियम कार्बोनेट पावडर हाताला लावतात. आता यासाठी स्पर्धकांना स्वतंत्र द्यावी लागेल. काही खेळाडू तर त्याचे खडूही वापरतात. ते त्यांचे स्वतंत्र असतात. त्याची आता अंमलबजावणी करावी लागेल, असेही जोशी म्हणाले. 

धनांवर सराव होत नाही, तोपर्यंत खेळाडूंना आपल्या कामगिरीबाबत विश्वास वाटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सराव जुलैमध्ये सुरू होऊ शकेल. त्यातही सुरुवातीस राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धक असतील. त्यांना पूर्ण सराव सुरू होण्यास काही महिने लागतील, त्यामुळे स्पर्धा सुरू होण्यास डिसेंबर उजाडेल, असे त्यांनी सांगितले. 

जिम्नॅस्टिक्‍समधील विविध प्रकार व त्याच्या स्पर्धा : 
- आर्टिस्टिक्‍स जिम्नॅस्टिक्‍स ः
प्रत्येक साधनांवर वैयक्तिक सादरीकरण, त्यामुळे सुरक्षित अंतर आपोआप. या साधने - उपकरणांचे निर्जंतुकीकरण सातत्याने करणे आवश्‍यक पुरुषांची स्पर्धा फ्लोअर एक्‍सरसाइज, पॉमेल हॉर्स, रिंग्स, वॉल्ट, पॅरलल बार्स आणि हॉरिझोंटल बार या सहा विभागात, तर महिलांची स्पर्धा वॉल्ट, अनईव्हन बार्स, बीम आणि फ्लोअर एक्‍सरसाइज या चार विभागात 
- रिदमिक जिम्नॅस्टिक्‍स ः प्रामुख्याने महिला विभागात होणाऱ्या या स्पर्धेत रिबन, बॉल, हूप, रोप आणि क्‍लबचा वापर. पाच साधनांसह होणारी स्पर्धा एका चौकोनावर. खेळाडूंची साधने वैयक्तिक, त्यामुळे केवळ स्पर्धा होणाऱ्या भागाचेच निर्जंतुकीकरण आवश्‍यक 
- पोलीन जिम्नॅस्टिक्‍स ः यात दुहेरीचीही स्पर्धा; पण सहकारी स्पर्धक वेगवेगळ्या पोलीनवर. खेळाडूंच्या शूज व हातांचे निर्जंतुकीकरण पुरेसे. यातील टम्बलिंग स्पर्धा वैयक्तिकच 
- एरोबिक जिम्नस्टिक्‍स ः स्पर्धा वूडन फ्लोअरिंगवर. खेळाडूंच्या शूजचे निर्जंतुकीकरण तसेच हातांना निर्जंतुक लावल्यास स्पर्धा शक्‍य. मात्र दुहेरी तसेच सांघिक स्पर्धा विलंबाने 
- ऍक्रोबॅटिक्‍स जिम्नॅस्टिक्‍स ः दुहेरी तसेच सांघिक स्पर्धा त्यामुळे कोरोना चाचणीशिवाय स्पर्धा सुरू होणे अवघड 
- पारकोर जिम्नॅस्टिक्‍स ः हा नवीन प्रकार पूर्णपणे वैयक्तिक, त्यामुळे संयोजनात प्रश्न नाही. 

पंचांचे मूळचे सुरक्षित अंतर 
जिम्नॅस्टिक्‍स पंच स्पर्धा ठिकाणापासून दूर असतात. त्यामुळे स्पर्धक आणि त्यांच्यात सुरक्षित अंतर असतेच. त्याचबरोबर मुळातच पंचांची आसनव्यवस्था एकमेकांपासून दूर असते. त्यांनी एकमेकांनी दिलेले गुण बघू नयेत; तसेच गुण देण्यापूर्वी चर्चा करू नये, यासाठी असलेली व्यवस्था सुरक्षित अंतर ठेवते. रिदमिक, एरोबिक आणि ऍक्रोबॅटिक्‍स स्पर्धेच्या वेळी पंच शेजारी असतात, त्यांच्यातील अंतर वाढवणे सहज शक्‍य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com