Women Chess Championship: पहिल्या डावात हम्पीचा शानदार विजय; विश्वकरंडक महिला बुद्धीबळ
Koneru Humpy: भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने महिला विश्वकरंडक बुद्धीबळ स्पर्धेत चीनच्या युशिन साँगवर शानदार विजय मिळवला. इंग्लिश ओपनिंग आणि कॅटलन रचनेमध्ये हम्पीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली.
बाटुमी (जॉर्जिया): भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने महिला विश्वकरंडक बुद्धीबळ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या डावात चीनच्या युशिन साँगवर मात करीत उपांत्य फेरीकडे भक्कम वाटचाल केली.