अरेss हा विकेटकिपर तर धोनीपेक्षाही वाढीव निघाला!

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

यष्टीरक्षण म्हटले की सर्वप्रथम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव समोर येते. त्याच्या यष्टीरक्षणाच्या नवनव्या पद्धती पाहून आजवर अनेकजण थक्क झाले आहेत. मात्र, आता धोनीच्या यष्टीरक्षणालाही मागे टाकणारा प्रकार नुकताच घडला आहे. 

लंडन : यष्टीरक्षण म्हटले की सर्वप्रथम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव समोर येते. त्याच्या यष्टीरक्षणाच्या नवनव्या पद्धती पाहून आजवर अनेकजण थक्क झाले आहेत. मात्र, आता धोनीच्या यष्टीरक्षणालाही मागे टाकणारा प्रकार नुकताच घडला आहे. 

हा प्रकार ट्वेंटी20 ब्लास्टमध्ये हॅम्पशायर आणि ससेक्स यांच्यात झालेल्या सामन्यात घडला. हॅम्पशायर संघाचा यष्टीरक्षक लुईस मॅकमनसने ससेक्सचा फलंदाज लॉरी इव्हॅन्सला एका नव्या स्टाईलमध्ये बाद केले. 

सामन्याच्या दहाव्या षटकात हा प्रकार घडला. गोलंदाज मसन क्रेनचा चेंडू लेग स्टंपवर पडला आणि फलंदाजाला चकवून किपरच्या हातात गेला. किपरकडे चेंडू जाताच त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला चेंडू पकडण्यात यश आले, पण ही बाब फलंदाजाच्या लक्षात आले नाही. तो क्रीझच्या बाहेर जाऊ लागला, तेवढ्यात मॅकमनसनं त्याला धावचित करत बाद केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hampshire vs sussex witnessed a crazy stumping in T20 Blast