
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज ही दुसरी महिला क्रिकेटर आहे.
Women's Cricketer Mithali Raj Birthday : महिला क्रिकेट जगतात क्रिकेटच्या देवाची उपमा दिले जाणारे नाव म्हणजे मिताली राज. महिला क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित करुन देशाच्या लेकींसमोर तिने (Mithali Raj) एक आदर्श ठेवला आहे. आजही महिला क्रिकेटला (W omens Cricket) 'अच्छे दिन' आलेले नाहीत. पण मितालीकडे बघून क्रिकेटच्या मैदानाकडे वळलेल्या अनेक जणी मात्र करियरचा आलेख उंचावताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, आंतरराष्ट्रीय महिला कसोटीत सर्वात कमी वयात द्विशतक झळकवाणारी क्रिकेटर आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज ही दुसरी महिला क्रिकेटर आहे.
क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या मितालीचा (Mithali Raj Birthday) जन्म 3 डिसेंबर 1982 मध्ये झाला. आज ती क्रिकेटमधील लक्षवेधी महिलांच्या यादीत अव्वलस्थानी असली तरी तिचे पहिले प्रेम क्रिकेट नव्हते. ती जेवढी चांगली बॅटर आहे तेवढीच भारी ती नृत्यांगणा आहे. अनेक मुलाखतमीध्ये तिने पहिले प्रेम क्रिकेट नाहीतर डान्स असल्याचे कबुल केले आहे. तिने भरत नाट्यमचे खास ट्रेनिंग घेतले आहे. मिताली तिच्या भावामुळे क्रिकेटकडे वळली. मैदानात तिचा खेळ पाहून वडिलांनी तिला क्रिकेटचे धडे घेण्यासाठी प्रवृत्त केले. सुरुवातीला मितालीला क्रिकेटपेक्षा डान्समध्येच उत्तम काहीतरी करु शकतो असे वाटत होते. पण वडिलांनी समजवल्यानंतर तिने क्रिकेटच्या ट्रेनिंगला सुरुवात केली आणि आज ती क्रिकेटमधील एक आदर्श बनली आहे.
मितालीला सर्वोत्तम बॅटर बनवण्यात तिच्या आई-वडिलांची भूमिका खूपच मोठी आहे. मुलीच्या प्रॅक्टिसमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी मितालीच्या आईने जॉब सोडला होता. पुढे मिलालीने आईच्या त्यागाला न्याय दिला. अजूनही ती क्रिकेटच्या मैदानात आपल्यातील धमक दाखवून देताना दिसते.
लग्नाच्या प्रश्नाबाबतचा बाऊन्सर
मिताली राज 38 वर्षांची झालीये, पण तिने अद्याप लग्न केलेले नाही. मैदानात प्रतिस्पर्धी संघाकडून तिला जसा बाऊन्सरचा मारा होतो. अगदी तसाच बाऊन्सर तिला लग्नाबाबतच्या प्रश्नावरुनही बऱ्याचदा केला जोता. याचा सामनाही ती आपल्या खास शैलीत करते. एका मुलाखतीमध्ये तिने लग्नाबातच्या प्रश्नावर मजेशीर रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले होते. लग्नाबद्दल ती म्हणाली होती की, सुरुवातीला लग्न करावे, असे वाटायचे. पण जेव्हा लग्न झालेल्या लोकांकडे पाहते तेव्हा सिंगरच बरी आहे, असे वाटते. सध्याच्या घडीला माझ्या मनात लग्नाचा विचारच येत नाही, असे तिचे म्हणने आहे.
1999 मध्ये पदार्पण, अन्....
मितालीने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच तिने 114 धावा केल्या होत्या. मितालीने वनडेत 7 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या खात्यात 10 हजारहून अधिक धावा आहेत. धावांच्या सरासरीमध्ये ती उत्तम आहे. त्यामुळेच तिला महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर असेही संबोधले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.